Shiv Sena candidate Uddhav Kamble during the dramatic incident involving the AB form, as police and election officials look on in shock. sarkarnama
पुणे

AB Form Swallow Video : उमेदवाराने दुसऱ्याचा एबी फाॅर्म गिळला; निवडणूक कार्यालयातच तमाशा, पोलिसही अवाक

Uddhav Kamble PMC Election AB AB Form : निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज पाहण्यासाठी गेलेल्या उमेदवाराने दुसऱ्याच उमेदवाराचा अर्ज फाडून गिळल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली.

Roshan More

PMC Election : महापालिका निवडणुकीत उमेदवारी आणि एबी फाॅर्म देण्यावरून वेगळेच नाट्य पाहण्यास मिळाले. एकाच जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने दोन जणांना एबी फाॅर्म दिले होते.मात्र एका उमेदवाराने निवडणूक कार्यालयात जात दुसऱ्या उमेदवाराचा एबी फाॅर्म गिळला. ही धक्कादायक घटना पुणे महापालिकेचे कात्रजमधील क्षेत्रीय कार्यालयात घडली.

एबी फार्म गिळलेल्या उमेदवाराचे नाव उद्धव कांबळे असे आहेत. ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पद्मावती प्रभाग क्रमांक 36 मधून उमेदवार होते. मात्र, याच जागेवरून मच्छिंद्र ढवळे यांना देखील पक्षाने एबी फाॅर्म दिला होता. ढवळे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे कांबळे यांना भीती वाटली की ढवळेंन आधी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी ग्राह्य धरून आपला अर्ज बाद केला जाईल.

कांबळे यांनी कात्रज येथील क्षेत्रीय कार्यालय गाठत तेथील कर्मचाऱ्यांना उमेदवारी अर्ज दाखवण्याची विनंती केली. नियमानुसार उमेदवाराला आलेले अर्ज पाहण्याची परवानगी असते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना अर्ज दाखवले. त्यावेळी ढवळे यांचा उमेदवारी अर्जासोबतचा एबी फाॅर्म पटकन फाडून घेऊन कांबळेंनी तेथून धूम ठोकली. कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करताच चक्क एबी फाॅर्म स्वतःच्या तोंडात कोंबून तो गिळला.

पोलिसही अवाक...

कांबळे यांच्या कृत्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलेल्या. घडलेली घटना ऐकूण पोलिस देखील अवाक झाले. पोलिसांनी कांबळे यांना ताब्यात घेतले होते. निवडणूक अधिकारी मनीषा भूतकर यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी तसेच सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याप्रकरणी उद्धव कांबळे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT