Sushma Andhare on Pune Vidhan sabha Election : पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघावरून सध्या महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात चढाओढ पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे विद्यमान आमदार असताना देखील ही जागा आपल्याला मिळावी यासाठी भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक आटापिटा करताना दिसत आहे.
तर दुसरीकडे माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटातून आपल्याला तिकीट मिळणार या भरोशावर पक्षप्रवेश केला आहे. मात्र आता शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघासाठी जोरदार फिल्डिंग सुरू केल्याचे दिसत आहे. या मतदारसंघांमध्ये माझ्या जिल्ह्यातून आलेले 63 हजार मतदार वसले असून त्या संदर्भातील अहवाल वरिष्ठांना पाठवला असल्याचं सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी सांगितला आहे.
पुण्यामध्ये सुषमा अंधारे यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, शहरातील तीन जागांवरती आम्ही दावा सांगितला आहे. त्यामध्ये हडपसर, कोथरूड आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. तिन्ही जागांवर शिवसेना (ठाकरे गट) निवडणूक लढणार असून त्याच सोबतच पारनेर मतदारसंघावर देखील आम्ही दावा सांगितला आहे.
आता श्रीगोंदा की पारनेर याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. परंतु मी पुणेकर म्हणून आणि वडगाव शेरीतील रहिवासी म्हणून पक्षाची त्या मतदारसंघांमध्ये काय स्थिती आहे. याबाबतचा अहवाल मला मागण्यात आला होता. त्यानुसार मी वरिष्ठांकडे वडगाव शेरी बाबतचा अहवाल सादर केला आहे.
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये संजय भोसले हे त्या ठिकाणावरून तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. तसेच ते पुणे महापालिकेत शिवसेनेचे(Shivsena) गटनेते देखील होते. सतीश मुळीक हे माजी नगरसेवक देखील वडगाव शेरी मतदार संघातून येतात. त्यासोबतच किरण जठार या माजी नगरसेविका देखील आमच्यासोबत आहेत आणि मी ज्या जिल्ह्यातून येते त्या जिल्ह्यातील 63 हजारांचं मतदान हे वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये वास्तव्याला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे आणि त्यामध्ये शिवसेना (ठाकरे गटाची) या मतदारसंघात मोठी ताकद आहे. असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं आहे.
शिवसेना ठाकरे गटामध्ये नुकताच प्रवेश केलेल्या वसंत मोरे(Vasant More) यांनी देखील खडकवासला विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. याबाबत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आम्ही पुणे लोकसभेचा विचार करत असून त्यामध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघ येत नाही. मात्र जेव्हा पुणे जिल्ह्याचा विचार होईल तेव्हा बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये असलेला खडकवासला मतदारसंघ देखील आमच्याकडे घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.