Sanjay Raut, Eknath Shinde Sarkarnama
पुणे

Sanjay Raut: राऊतांची पाठ फिरताच ठाकरे सेनेला पडलं खिंडार; 500 कार्यकर्त्यांचा 'जय महाराष्ट्र'

मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी पाच वाजता हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आसल्याचे समोर आले आहे.

Sudesh Mitkar

Pune, 28 Jan 2025: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये मात्र सातत्याने गळती लागल्याचे पाहायला मिळत आहेत.

काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे माजी नगरसेवक असलेल्या पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षातील पाचशे कार्यकर्ते, आणि पदाधिकारी आज शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होणार आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्याचा दौरा केला होता. या दौऱ्या दरम्यान त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

बैठकीला माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याचा पाहायला मिळालं. त्यामुळे ठाकरे सेनेमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या बातम्या येत असतानाच ठाकरे सेनेतील पाच माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

काल (सोमवारी) पुन्हा संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आले होते. त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष संघटनेबाबत तक्रारी केल्या असल्याचे समोर आले आहेत. काल संजय राऊत पुणे दौरा वरून परत गेल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी आता पुन्हा एकदा ठाकरे च्या पक्षाला गळती लागली आहे.

सलग दुसऱ्यांदा संजय राऊत यांचा दौरा झाल्यानंतर ठाकरे गटाला पुण्यात गळती लागली आहे. आज ठाकरे गटातील 400 ते 500 कार्यकर्ते शाखाप्रमुख आणि विभाग प्रमुख शिंदे गटात करणार प्रवेश करणार आहेत.

मुंबईतील बाळासाहेब भवन या ठिकाणी पाच वाजता हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष नाना भानगिरे आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आसल्याचे समोर आले आहे.

आज शाखाध्यक्ष आणि विभागप्रमुखांचा पक्षप्रवेश सोहळा झाल्यानंतर 31 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या पुरंदर येथील सभेत काही नगरसेवक देखील करणार प्रवेश करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या 2 महिन्यात संजय राऊत यांचे 2 दौरे झाले या दोनही दौऱ्यानंतर ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

पहिल्या दौऱ्यानंतर 5 माजी नगरसेवकांनी सोडला होता आत्ता 500 कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिट्टी दिल्याने संजय राऊत यांच्या दौऱ्यांची सध्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT