shrikant shinde | eknath shinde.jpg sarkarnama
पुणे

Assembly Election 2024 : शहर की जिल्हाप्रमुख, CM पुत्र पुण्यात कुणाचा हट्ट पुरविणार?

Pune Assembly Election 2024 : जागावाटपात पुणे शहरातील आठपैकी खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे.

Sudesh Mitkar

विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला पुणे शहरातील आठपैकी तीन विधानसभा मतदारसंघ आपल्या वाट्याला यावे, असं वाटत आहे. असं असलं, तरी प्रत्यक्षात शहरातील एकच मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा मतदारसंघ हडपसर की खडकवासला? याबाबत सध्या चर्चा रंगली आहे.

हडपसर विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ( Shivsena ) शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे इच्छुक आहे. तर, जिल्हाप्रमुख रमेश कोंडे यांनी खडकवासला मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा, असा हट्ट धरून बसले आहेत. हा गुंता सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे पुणे दौऱ्यावरती येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

जागावाटपात पुणे शहरातील आठपैकी खडकवासला, हडपसर आणि वडगाव शेरी या तीन विधानसभा मतदारसंघाची मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. सध्या पुण्यात भाजपचे पाच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आणि काँग्रेसचा एक, असं आमदार आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला एखादी जागा द्यायची झाल्यास, अजित पवारांच्या ( Ajit Pawar ) राष्ट्रवादीला किंवा भाजपला विद्यमान आमदार असलेली एका जागेवर पाणी सोडावे लागणार आहे. मात्र, ही जागा हडपसर की खडकवासल्याची असणार? याबाबत मतमतांतर असल्याचं पाहायला मिळत आहे.

हडपसरमधून शहरप्रमुख नाना भानगिरे तयारी करत आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेल्या रमेश कोंडे यांनी देखील कसल्याही परिस्थितीत यंदाची विधानसभा लढवण्याचं चंग बांधला आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी ते आग्रही आहेत. पण, तिकीट न मिळाल्यास ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत.

विधानसभेचा आढावा घेण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे गणपतीनंतर पुण्यात येणार आहेत. तेव्हा, विधानसभेच्या गणितांची आकडेमोड करून, नेमका कुठल्या मतदारसंघावर दावा करायचा, याबद्दल श्रीकांत शिंदे निर्णय घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT