Daund Politics : दौंडला महायुतीत बिघाडी फिक्स; रमेश थोरातांनी पुन्हा दंड थोपटले!

Assembly Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघा शेजारील दौंडमध्ये महायुतीमधील भाजपचे आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे दोन नेते विधानसभेत एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.
Ramesh Thorat
Ramesh ThoratSarkarnama
Published on
Updated on

Pune, 15 September : महायुतीमध्ये अनेक जागांवरून बिघाडी होण्याची शक्यता दिसून येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अनेक जागांवर थेट भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची समोरासमोर लढत झाली आहे, त्यामुळे अनेक मातब्बर नेते सध्या महायुतीमध्ये आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघा शेजारील दौंडमध्ये महायुतीमधील भाजपचे आमदार राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार रमेश थोरात हे दोन नेते विधानसभेत एकमेकांना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.

दौंडमध्ये (Daund) मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (BJP) तिकिटावर निवडून आलेले राहुल कुल आमदार आहेत. मागील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत रमेश थोरात यांचा अवघ्या 746 मतांनी पराभव झाला होता. त्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी रमेश थोरात (Ramesh Thorat) पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी तशी तयारीलाही सुरुवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकांमधून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. महायुतीकडून राहुल कुल (Rahul Kul) यांना उमेदवारी मिळणार, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे कुल आणि रमेश थोरात लढत पुन्हा होण्याची चिन्हे दिसून येत आहेत

Ramesh Thorat
Georai politics : भाजप आमदाराला राष्ट्रवादीने घेतले फैलावर; ‘पराभवाच्या भीतीने रडू नका...लढून पडा’

रमेश थोरात यांनी विधानसभेची आगामी निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवावी, यासाठी त्यांचे कार्यकर्ते आग्रही आहेत. थोरात यांनी आगामी निवडणूक ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवावी, असा समर्थकांचा त्यांच्यावर दबाव वाढत आहे. दुसरीकडे, रमेश थोरात हे मात्र अपक्ष निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

विधानसभेच्या 2009 च्या निवडणुकीत रमेश थोरात हे अपक्ष निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे रमेश थोरात यांचा कल पुन्हा एकदा अपक्ष निवडणूक लढवण्याकडे असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे.

Ramesh Thorat
Dhangar Agitation : धनगर आरक्षण आंदोलन; पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडली, एकजण चक्कर येऊन कोसळला

दौंड मतदारसंघातून आमदार राहुल कुल हे भाजपच्या चिन्हावर निवडून आले असले तरी आगामी निवडणुकीसाठी भाजपकडून निष्ठावंतांना न्याय द्यावा. मूळच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवार मिळावी, अशी मागणी भाजकडून होत आहे, त्यामुळे आगामी निवडणुकीत राहुल कुल यांची कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com