Assembly Election 2024 : पुण्यातील दोन जागांसाठी 'मविआ'तील 40 जण इच्छुक; 'ते' फेवरेट मतदारसंघ कोणते?

Pune Assembly Election 2024 : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं. त्यामुळे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे.
Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nana  Patole
Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nana Patole Sarkarnama
Published on
Updated on

पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यात आले आहेत. या आठ जागांसाठी महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून तब्बल 85 जण इच्छुक असल्याचे समोर आलं आहे. असं असलं तरी यातील निम्मे इच्छुक हे अवघ्या दोन मतदारसंघांमध्ये आहे.

या दोन मतदारसंघांमध्ये ठाकरेंची सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून तब्बल 40 जणांनी दावा ठोकला आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं. त्यामुळे महाविकास आघाडीतील इच्छुकांचा विश्वास द्विगुणीत झाला आहे. महाविकास आघाडीचे तिकीट म्हणजे विजयाची हमखास 'गॅरंटी' असंच काहीसं महाविकास आघाडीच्या इच्छुक नेत्यांना वाटत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सध्याचे पुण्यातलं चित्र पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार ( Ncp ) पक्षाकडे सर्वाधिक इच्छुक असून तब्बल 41 जणांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्या खालोखाल 24 जण हे काँग्रेसकडून इच्छुक आहेत. तर शिवसेना ( Shivsena ) ठाकरे गटाकडून देखील वीस जणांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याचा चंग बांधला आहे.

Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nana  Patole
Mahayuti News : हडपसर मतदारसंघावरून सस्पेन्स कायम; तुपेंना धाकधूक तर भानगिरे यांच्या आशा पल्लवीत

शिवाजीनगरच्या येथे जागेसाठी 21 जण इच्छुक

यामध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार हे शिवाजीनगर आणि वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आठ इच्छुक उमेदवार आहे. उदय महाले, किशोर कांबळे श्रीकांत पाटील, निलेश निकम ,सुकेश पासलकर, अरुण शेलार, औदुंबर पाटील, आणि किसन गारगोटे यांचा समावेश आहे.

तर काँग्रेसकडून देखील या विधानसभा मतदारसंघांमधून निवडणूक लढवण्यासाठी आठ इच्छुकांनी अर्ज केला आहे. यामध्ये दत्ता बहिरट, जावेद निलघर, कैलास गायकवाड, मनीष आनंद, पूजा आनंद, राज निकम, महेंद्र सावंत आणि रमेश पावळे यांचा समावेश आहे. सोबतच या मतदारसंघातून काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे हे देखील इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. सध्या भाजपमध्ये असलेले सनी निम्हण यांनी देखील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेसकडून या मतदारसंघात तब्बल 10 जण इच्छुक आहेत. शिवसेना ( Shivsena ) ठाकरे गटाकडून माजी नगरसेवक प्रशांत बधे यांच्यासह दोन जण इच्छुक आहेत. यामुळे शिवाजीनगरच्या एका जागेसाठी तब्बल 21 महाविकास आघाडीकडून तिकीट मिळण्यासाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

Sharad Pawar | Uddhav Thackeray | Nana  Patole
Mahavikas Aghadi : अबब! पुण्यात 'मविआ'कडून विधानसभा लढवण्यासाठी तब्बल 85 इच्छुक

वडगाव शेरीतून 19 जण इच्छुक

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सात जणांनी निवडणूक लढवण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. यामध्ये रमेश आढाव, सुनील खांदवे, अर्जुन चव्हाण, नीता गलांडे, मेघा कुलकर्णी, भीमराव गलांडे आणि आशिष माने हे इच्छुक आहेत. भाजपचे माजी नगरसेवक बॉबी टिंगरे आणि माजी आमदार बापू पठारे हे देखील 'तुतारी' चिन्हावरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.

काँग्रेसचा विचार केला तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमधून 5 इच्छुक आहेत. यामध्ये संजय पाटील, रमेश सकट, सुनील मलके आणि राजू ठोंबरे यांचा समावेश आहे. ठाकरे गटाक़ून सुषमा अंधारे, माजी नगरसेवक संजय भोसले, यांच्यासह चार जण इच्छुक आहेत. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांतील तब्बल 19 जण वडगाव शेरीतून इच्छुक असल्याचे समोर आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com