Shrirang Barne, Sanjogh Waghere Sarkarnama
पुणे

Shrirang Barne News : मोठी बातमी! खासदार श्रीरंग बारणेंच्या अडचणी वाढणार, पराभूत शिलेदाराची उच्च न्यायालयात धाव; काय आहे कारण?

Maval Loksabha Election 2024 Result: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचा पराभव करत खासदारकीची हॅट्ट्रिक साधली होती.पण आता...

Deepak Kulkarni

Maval News : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास 60 पेक्षा जास्त दिवसांचा कालावधी उलटला आहे.तरीदेखील काही जणांना अजूनही पराभव पचवता आलेला नाही. त्यामुळे नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नीलेश लंके यांच्या खासदारकी विरोधात भाजपच्या सुजय विखेंनी कोर्टात धाव घेतली आहे.

तिकडे मुंबईत शिंदे गटाच्या रवींद्र वायकरांच्या विजयाला ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. आता पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या खासदारकीवर ठाकरे गटानं आक्षेप घेतला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मावळमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे (Shirirang Barne) यांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचा पराभव करत खासदारकीची हॅट्ट्रिक साधली होती.पण आता त्यांचा हा विजय अडचणीत येण्याची शक्यता आहे.कारण मावळ मतदारसंघाच्या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.

पराभूत अपक्ष उमेदवार अ‍ॅड.राजू पाटील बारणेंच्या खासदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.त्यांनी याचिका दाखल केली आहे.त्यामुळे आता मतदारसंघातली लढाई जिंकलेल्या बारणेंसमोर आता कायदेशीर लढाई जिंकण्याचं आव्हान असणार आहे.

पराभूत अपक्ष उमेदवार राजू पाटील यांच्याकडून खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयावर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. संबंधित याचिकेत पाटील यांनी मतमोजणी आणि प्रचारावेळी गैरप्रकार झाल्याचं म्हटलं आहे.

मावळ(Maval) लोकसभेसाठी करण्यात आलेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणीत आलेले मतदानात यात जवळपास 573 मतांची तफावत असल्याचा आरोप राजू पाटील यांनी केला आहे.मतमोजणी सुरू असताना अनेक अनोळखी व्यक्ती मतमोजणी केंद्रावर फिरत होते.याविषयी रितसर तक्रार करुनही त्याची दखल घेतली गेली नाही असल्याची तक्रारही पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना धार्मिक ध्रुवीकरण केल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार राजू पाटील यांनी केला आहे.यासंबंधीचे पुरावे याचिकेत दिले आहेत. बारणे हे धार्मिक ध्रुवीकरण करुन जिंकून आल्याचा आरोप त्यांनी याचिकेत केली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपबरोबर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढविली. महाराष्ट्रात भाजपचे नऊ खासदार निवडून आले तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सात खासदार विजयी झाले. मात्र असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या शिंदे गटाची केवळ एकाच केंद्रीय राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आल्याने शिंदे यांच्या खासदारांमध्ये नाराजी पसरली होती. मंत्रिपदे देताना दुजाभाव करण्यात आल्याचा आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्यामुळे महायुतीतील खदखद बाहेर आली होती.

महायुतीत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाने मंत्रिपदे देताना शिवसेनेबरोबर दुजाभाव केला असल्याचा आरोप बारणे यांनी केला होता. आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता,आम्हाला कॅबिनेट मंत्री पद द्यायला हवं होतं. पण एक राज्यमंत्रीपद आम्हाला देण्यात आल्याचेही बारणे यांनी काही दिवसांपूर्वी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT