Pune : पुण्यातील पुण्येश्वर मंदिराच्या आवारातील दर्ग्याचे बांधकाम पाडण्याच्या मागणीवरून भाजप आक्रमक झाली आहे. भाजप आमदार, नेते नितेश राणे यांनी थेट महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची जबाबदारी असणाऱ्यांना दमच भरला होता. याचवेळी अधिकाऱ्यांनी देखील जशास तसे उत्तर दिले होते.
याचदरम्यान, त्यातून आमदार राणे आणि माजी खासदार संजय काकडेंमध्ये देखील जुंपल्याचे पाहायला मिळाले होते. आता हा वाद मिटत नाहीतोच ठाकरे गटाने आमदार राणेंवर हल्लाबोल केला आहे. महानगरपालिकेचे आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या नितेश राणेंची आमदारकी का रद्द करण्यात येऊ नये, असा सवाल उपस्थित केला आहे.
ठाकरे गटाचे पुणे शहर प्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी प्रसिध्दपत्रकाद्ववारे भाजप आमदार नितेश राणें(Nitesh Rane)चा खरपूस समाचार घेतला आहे. देशातील नेते राहुल गांधी यांची खासदारकी सूडबुध्दीने कारवाई करून रद्द करण्यात आली. इथे तर जाहीररित्या सरकारी अधिकाऱ्यांचा अपमान करून, शिवीगाळ करून धमकी देण्यात आली.
तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांना कामकाजाविषयी 48 तासांची मुदत देण्यात आली. तांत्रिकदृष्ट्या अशी मुदत देणे योग्य नसताना असला बोलघेवडेपणा पुण्यात येऊन करणे म्हणजे एक स्टंट आहे. प्रसिध्दीसाठी पुणे शहर यांना सॉफ्ट टार्गेट वाटत आहे. मग या नितेश राणेंची आमदारकी का रद्द करण्यात येऊ नये ? असा हल्लाबोल ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.
ठाकरे गटानं पत्रकात काय म्हटलंय ?
नितेश राणे पुण्यात आले आणि त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त आणि नगर अभियंता यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या विरोधात निदर्शन केली. खरतर शहरातील अनेक वाघांपैकी एका वाघाने पुढे येउन अॅट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पत्रकाद्वारे केली आहे.
पुणे भारतीय जनता पार्टीचे कोणीही नेते ना अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आणि ना नितेश राणे यांच्या समर्थनार्थ पुढे आले. पुण्यातील भाजपचे नेते हे एकतर बिल्डर आहेत, नाहीतर बिल्डरांचे हस्तक आहेत. त्यांना ना अधिकाऱ्यांची पडली ना नितेश राणेंची असे म्हणत आगामी निवडणुकीत पुणेकर भाजपला त्यांची जागा दाखवून देतील असेही ठाकरे गटाचे(Thackeray Group) शहरप्रमुख संजय मोरे आणि गजानन थरकुडे यांनी म्हटलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील पुणेश्वर मंदिराच्या प्रश्नावरून भाजप (BJP)च्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दर्ग्यातील बांधकाम पाडण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी केली होती. यावेळी राणेंनीमहापालिकेच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या कारभारावर सडकून टीका केली. त्यात नितेश यांनी थेट महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची जबाबदारी असणाऱ्यांना दमच भरला.
तसेच "फक्त तारीख जाहीर करू, मग इतिहास घडवण्यासाठी तयार राहा असा इशाराही प्रशासनाला दिला होता. त्यावरून महापालिकेतील वातावरण तापून अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही निषेध करून नितेश यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. याच मुद्द्यावरुन भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी नितेश राणे यांच्यात देखील शाब्दिक चकमक उडाली होती.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.