Nitesh Rane- Sanjay Kakde Dispute : नितेश राणेंची आता सटकलीच ; संजय काकडेंना झाप झाप झापले अन्...

BJP Politics : काकडेंचे शब्द ऐकताच नितेश यांचा ‘मूड’ बदलला
Nitesh Rane- Sanjay Kakde Dispute :
Nitesh Rane- Sanjay Kakde Dispute :Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या साऱ्याच नेत्यांवर रोज सकाळी-दुपारी तोंडसुख घेणाऱ्या भाजप नेते नितेश राणेंवर भाजपचेच माजी खासदार संजय काकडे हे पुन्हा एकदा नाराज झाले आणि भडकलेही. नितेश राणेंनी पुण्यात केलेल्या जहरी भाषणावर आक्षेप घेत काकडेंनी नितेश यांच्याकडे बोट दाखवले. नितेश यांच्या भाषेने पक्षावर परिणाम होत असल्याचे काकडेंनी माध्यमांपुढे बोलून दाखविले.

पण, काकडेंच्या या भूमिकेवर नितेश हे काही गप्प राहिले नाहीत. काकडेंचे शब्द ऐकताच नितेश यांचा ‘मूड’ बदलला आणि खिशातील मोबाईल कानाला लावून त्यांनी काकडेंना झाप झाप झापले. ‘मी पक्षाचे काम करतो आहे. आपण सल्ला देणारे कोण, तक्रार कशी काय करता, पक्षाचा अजेंडा ठाऊक आहे का, ’असे राणे स्टाईलचे आठ-दहा सवाल करीत, नितेश यांनी काकडेंची बोलतीच बंद केली. एरवी, माध्यमांपुढे चढ्या आवाजात बोलणारे काकडेही नितेश यांचा आवाज आणि भाषा ऐकून काहीसे गडबडलेच.

Nitesh Rane- Sanjay Kakde Dispute :
Chandrababu Naidu Arrested : मोठी बातमी : आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना अटक

नेमकं झालं काय?

पुण्यातील पुण्येश्‍वर मंदिराच्या आवारातील दर्गायाचे बांधकाम पाडण्याच्या मागणीवरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यातून पक्षाने नितेश राणेंच्या नेतृत्वात चार दिवसांआधी महापालिकेतून मोर्चा काढला. तेव्हा, नितेश यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह त्यांच्या कारभारावर सडकून टीका केली. त्यात नितेश यांनी थेट महापालिका आयुक्त आणि अतिक्रमण विभागाची जबाबदारी असणाऱ्यांना दमच भरला. त्यावरून महापालिकेतील वातावरण तापून अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही निषेध करून नितेश यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

या घटनेवरून काकडेंनी आपला रोष मांडत नितेश यांना सुनावलेे. ''कोणी कापाकापीची भाषा करीत असतील; त्याचा मी निषेध करतो. बेकायदा बांधकामांवर अधिकारी कारवाई करतील,'' असे सांगून काकडेंनी राणेंना सल्ला दिला. तेवढेच नव्हे; तर नितेश यांच्या बोलण्याची किंमत मोजावी लागत असल्याचा सूरही त्यांनी आळवला.

Nitesh Rane- Sanjay Kakde Dispute :
By Poll Election Result : 'इंडिया' आघाडीचा भाजपला 'दे धक्का'; सहा राज्यातील सातपैकी चार पोटनिवडणुकांमध्ये बाजी, तर भाजप तीन जागांवर विजयी

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील नितेश यांच्या बोलण्यावर काकडेंनी उघडपणे नाराजी मांडून, पक्षाच्या प्रतिमेचा मुद्दा उपस्थित केला होता. परंतू, पुण्यातील मोर्चावरून बोलणाऱ्या काकडेंना नितेश यांनीच ठणकावून सांगत, गप्प राहण्याचा सल्ला दिला.

मोर्चातील भाषणावर संजय काकडे काही बोलल्याचे कानावर येताच, नितेश यांनी शुक्रवारी रात्री (सव्वासात वाजता) काकडेंना फोन केला. तेव्हाच, अशा प्रकारे का बोलत आहात, याची विचारणा नितेश यांनी काकडेंनी केली. त्यानंतर काकडेंनी आपली बाजू मांडत, नितेश यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.

Nitesh Rane- Sanjay Kakde Dispute :
Maratha Reservation Meeting : मोठी अपडेट! 'सह्याद्री'वर सरकार अन् जरांगे पाटलांच्या शिष्टमंडळात महत्त्वाची बैठक

"मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार आहे. पण या (तुमच्या) भाषेमुळे पक्षापुढे अडचणी उभ्या राहतील, असे काकडेंनी सांगितले. परंतू, नितेश यांनी आपल्या नेहमीच्याच भाषेत काकडेंना सुनावले. पक्षाच्या आदेशानुसार काम करीत आहे. मुळात, मला पक्षाने काय आणि कसे बोलायचे हे सांगितले आहे. त्यावरच बोलतो. काहीही माहिती नसतानाही तुम्ही बोलून पक्षाचीच बदनामी करीत आहात, असेही नितेश यांनी काकडेंना अक्षरश: झापले. परिणामी, नितेश आणि काकडे यांच्यातील वादाला तोंड फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com