Sambhajiraje News : मराठा आरक्षणासाठीची सर्वपक्षीय बैठक अर्धवट सोडत संभाजीराजें ‘सह्याद्री’तून तडकाफडकी पडले बाहेर; म्हणाले...

Maratha Reservation Meeting : '' सर्वपक्षीय बैठकीला मला आमंत्रित केलं होतं....''
Sambhaji Raje
Sambhaji Raje Sarkarnama

Mumbai : जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनांनंतर आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. विरोधकांकडून सत्ताधारी भाजप प्रणित महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा जोरदार प्रयत्न सुरू आहे.

याचवेळी सरकारला या जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यात तीनदा अपयश आल्यावर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. पण बैठक सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ ते २० मिनिटांतच ते बैठकीतून बाहेर पडले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Sambhaji Raje
Eknath Shinde Vs Thackeray : " ठाकरे हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तेव्हाच..." ; शिंदेंबाबत 'या' नेत्याचा खळबळजनक दावा

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सोमवारी मराठा आरक्षणाविषयीची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil) यांच्या आमरण उपोषणावर या बैठकीत तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने आज रात्री सर्वपक्षीय बैठक बोलावली गेली आहे.

या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार उदयनराजे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) सर्वपक्षीय बैठक सुरु झाल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटांनंतर सह्याद्री अतिथीगृहाबाहेर आले. त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संभाजीराजे म्हणाले, सर्वपक्षीय बैठकीला मला आमंत्रित केलं होतं. मी माझा मुद्दा तिथे स्पष्टपणे मांडून निघालो असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कायद्यात बसत असेल तर कुणबी आरक्षण द्या अशी भूमिकाही बैठकीत मांडल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

माझ्या पंजोबाने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी देशात पहिलं आरक्षण कोल्हापूर संस्थानमध्ये दिलं होतं. बहुजन समजाला 1902 ला आरक्षण दिलं. त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि मराठा समाजाचा समावेश होतो. म्हणून मी 15-20 वर्षांपासून पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत असल्याचे संभाजीराजे छत्रपतींनी यावेळी सांगितले.

Sambhaji Raje
Nana Patole News : '' भाजप आणि मोदींच्या राज्यात 'हा' एक; माणूस सुखी...'', काँग्रेसच्या पटोलेंनी डागली तोफ

...त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं!

मनोज जरांगे पाटील हे गरीब मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं यासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. ते सलग तीन-चार वर्षांपासून उपोषणाला बसत आहेत. मी सुद्धा त्यांच्या उपोषणस्थळी भेट देत असतो. पण सरकार दरवर्षी त्यांना काहीतरी आश्वासन देतात. त्यानंतर एक वर्ष पुढे जातं. यावेळी सुद्धा मनोज जरांगे यांनी उपोषण पुकारलं. पण त्यांच्या आंदोलनावर अमानुषपणे लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्रात वेगळं वातावरण तयार झालं असल्याचेही ते संभाजीराजे म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Sambhaji Raje
Tanaji Sawant Visit Protester : मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार का ? आंदोलकांचा सावंतांना सवाल...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com