ramesh Bagve Sunil Kamble Sarkarnama
पुणे

Sunil Kamble Won : जमेची बाजू असताना देखील, काँग्रेसने कॅन्टोन्मेंट गमावला

Pune Cantonment Election Result: सुनील कांबळे यांचा 10320 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 76 हजार 32 मत पडली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना 65 हजार 700 मतं मिळाली आहेत.

Sudesh Mitkar

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाने काँग्रेसला तब्बल 16 हजारांची आघाडी दिली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस हा मतदारसंघ आपल्याकडे राखेल असं सर्वच राजकीय तज्ञ सांगत होते. मात्र लोकसभेनंतर भाजपने संघटनात्मक मोर्चे बांधणी करून हा मतदारसंघ अक्षरशः काँग्रेस कडून खेचून आणला असल्याचं पाहायला मिळाले.

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघांमध्ये यंदा देखील जुनाच सामना पाहायला मिळाला. 2019 मध्ये देखील कॅन्टोन्मेंट मध्ये महाविकास आघाडी कडून रमेश बागवे तर महायुतीकडून सुनील कांबळे हे मैदानात होते. निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता.

2019 मध्ये सुनील कांबळे यांनी रमेश बागवे यांचा अवघ्या 5 हजार मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीमध्ये रमेश बागवे यांनी ही मतांची आघाडी मोडून काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रचार केल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघांमध्ये मुस्लिम मतदारांची नेहमीच निर्णय राहिला आहे. आणि तो सातत्याने काँग्रेसच्या (Congress) पाठीशी राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे याच मुस्लिम मतदारांना केंद्रभागी ठेवून रमेश बागवे यांनी प्रचाराचे रणनीती आखल्याचे पाहायला मिळालं होतं. या मतदारसंघांमध्ये दोन लाख 95 हजार 358 मतदारांपैकी तब्बल 58 हजार मुस्लिम मतदार आहेत. या मुस्लिम मतदारांचे मत निर्णय ठरले असण्याची शक्यता होती. मात्र तसं होताना दिसले नाही.

(Maharashtra Election Assembly 2024 news)

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election) देखील या विधानसभा मतदारसंघात भाजप पिछाडीवर होता. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विजय मिळवला असला तरी कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातून त्यांना तब्बल 16000 मतांची पिछाडी पहावी लागली होती. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघात उमेदवार बदलावा अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात होती. त्यामुळे भाजपने विविध पर्यायांवर देखील विचार केला मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा सुनील कांबळे यांनाच मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला.

या विधानसभा मतदारसंघांमध्ये सुनील कांबळे आणि रमेश बागवे (Ramesh Bagve) यांच्या खेरीस तब्बल 20 उमेदवार रिंगणात होते. वंचित बहुजन आघाडीने देखील निलेश आल्हाट यांना पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात उमेदवार दिल्याने बहुजन मतांमध्ये काही प्रमाणात विभाजन झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी आठ हजार आठशे मतं घेतली. शेवटच्या टप्प्यामध्ये या विधानसभा मतदारसंघात भाजपने मोठ्या प्रमाणात जोर लावण्याचे पाहायला मिळालं तर दुसरीकडे रमेश बागवे हे आपली पारंपारिक निवडणूक रणनीतीवर काम करत राहिले.

(Vidhan Sabha Election 2024 result live news)

कांबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली विकासकामे आणि योजना आधारावर प्रचार करत होते. तर बागवे यांनी दहा वर्षांपूर्वी आमदार आणि मंत्री म्हणून आणि त्यापूर्वी पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून केलेली कामे मतदारांना सांगण्याचा प्रयत्न करताना पहिला मिळाले.

आज सुनील कांबळे यांचा 10320 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 76 हजार 32 मत पडली. तर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश बागवे यांना 65 हजार 700 मतं मिळाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT