Supreme Court  Sarkarnama
पुणे

Khed thasildar: सर्वोच्च न्यायालयाचा ज्योती देवरेंना मोठा झटका; खेड तहसीलदार नियुक्तीबाबत दिले महत्त्वाचे आदेश

Supreme Court On Khed thasildar : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)नं काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाला दणका देताना खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले होते.

Deepak Kulkarni

Pune News : खेड तहसिलदार नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला होता. पण आता या याचिकेवर उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत,,सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) प्रशांत बेडसे यांना खेड तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.⁠

विद्यमान तहसीलदार (Tahsildar) ज्योती देवरे यांची याचिका फेटाळली.महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण/मॅट आणि उच्च न्यायालयाने तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती आधीच रद्द केली आहे. देवरे यांच्या जागेवर तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. ⁠त्याविरोधात देवरे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

सर्वोच्च न्यायालयानं पहिल्याच सुनावणीच्यावेळी या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य नसल्यानं याचिका दाखल करून घेण्यास पात्र नाही, असे नमूद करत फेटाळले आहे. ⁠उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट)नं काही दिवसांपूर्वीच महसूल विभागाला दणका देताना खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची नियुक्ती रद्द करण्याचे आदेश दिले होते. मॅटने ज्योती देवरे यांच्या जागेवर तत्कालीन तहसीलदार प्रशांत बेडसे यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते.

पण पुढील सात दिवसात बेडसे यांना खेडच्या तहसीलदारपदी नियुक्त करण्याचे आदेश मॅटने दिले आहेत. प्रशांत बेडसे यांनी आपल्यावर झालेल्या कारवाईच्या विरोधात मॅट आणि हायकोर्टात दाद मागितली होती. हायकोर्टाच्या सूचनेनंतर मॅटने देवरे यांची बदली रद्द करुन बेडसे यांना नियुक्ती देण्याचे आदेश 25 फेब्रुवारी 2025 रोजी दिले होते.

प्रशांत बेडसे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी मास्क घातलं नाही, हे कारण हास्यास्पद असल्याचं मुंबई हायकोर्टानं म्हटलं होतं. पण आता हायकोर्टानं बेडसे यांना दिलासा देत त्यांचं निलंबन रद्द केलं होतं. यानंतर आता मॅटनंतर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं प्रशांत बेडसे यांची खेडच्या तहसीलदारपदी पुन्हा नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT