Supriya Sule  Sarkarnama
पुणे

NCP Sharad Pawar News : '...तर निवडणुकाच बंद करा'; सुप्रिया सुळे यांची सरकारकडे मोठी मागणी

Pune MLC election News : काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने, शरद पवार यांच्या पक्षाने आपला विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. मित्रपक्षांच्या या थेट आरोपानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

Sudesh Mitkar

Pune News : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पुणे विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवाराने माघार घेतल्याने महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या घडामोडीनंतर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने, शरद पवार यांच्या पक्षाने आपला विश्वासघात केल्याचा आरोप केला आहे. मित्रपक्षांच्या या थेट आरोपानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाने पुण्याची विधानपरिषदेचे जागा न लढवण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एकत्रित बैठक सिल्वरओक या ठिकाणी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान झाली आणि त्यानंतरच अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला काँग्रेसचे (Congress) आणि राष्ट्रवादीचे पुण्यातील वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीचा विचार केला तर 11 जागांवर उमेदवारांनी माघार घेतल्या असून त्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार देखील आहेत.

या विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान किती घोडेबाजार झाला, याबाबत सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे याबाबत मी एक पार्लमेंटमध्ये बिल आणणार आहे. ज्याद्वारे या निवडणुकीमध्ये होणारा घोडेबाजार थांबेल आणि पक्षाच्या व्हीपनुसार हातवर करून पारदर्शकपणे मतदान होईल. या बिलाद्वारे सरपंच टू संसद सर्व निवडणुका पारदर्शक होतील, असा मला विश्वास आहे.

याबाबत केंद्र सरकारकडे मागणी असणार आहे की एक तर हे इलेक्शन बंद करा, नाहीतर ओपन वोटिंग करा. त्यामुळे घोडेबाजार आणि त्या पद्धतीचे उद्योग सगळे बंद झाले पाहिजे. याबाबत इलेक्शन कमिशनला देखील मागणी करणार असून वेळ पडल्यास कोर्टात देखील जाणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, 'मला ही विधान परिषदेची निवडणूक कधीच रंगतदार वाटली नाही. या निवडणुकीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होईल, असे मला देखील वाटले नव्हते. विधान परिषदेच्या संदर्भातील बैठकींमध्ये देखील उत्साह दिसला नाही. निवडणुका रंगतदार केव्हा होतात जेव्हा लोकसभा, विधानसभा आणि महापालिका असतात. त्या निवडणुकीत मजा येते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT