Marathwada Shivsamvad tour: निवडणुकीच्या नादात 22 गुंठे जमीन विकली, भाजप उमेदवाराकडून पराभव; संकटात सापडलेल्या शिवसैनिकाला मदतीचा हात

Shrikant Shinde tour News : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मराठवाड्यातील शिवसंवाद दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. नांदेड, जालना, परभणी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठीच्या या दौऱ्यात काही भावनिक प्रसंगही पहायला मिळाले.
Madhav jadhav, Shrikant Shinde
Madhav jadhav, Shrikant Shinde sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांचा मराठवाड्यातील शिवसंवाद दौरा चांगलाच चर्चेत आला आहे. नांदेड, जालना, परभणी जिल्ह्यात संघटनात्मक बांधणीसाठीच्या या दौऱ्यात काही भावनिक प्रसंगही पहायला मिळाले. नगरपरिषदेच्या निवडणुकीत पत्नीला निवडून आणण्यासाठी 22 गुंठे जमीन विकली, पण नशीबात पराभव लिहला होता. हातची जमीन गेल्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शिवसैनिकासाठी खासदार श्रीकांत शिंदे हे संकटमोचकासारखे धावून आले.

पक्षासाठी झटणारा कार्यकर्ता अडचणीत असल्याची माहिती मिळताच श्रीकांत शिंदे यांनी त्याला ठाण्यात बोलावून घेतले. ज्या व्यक्तीकडे शिवसैनिकाची जमीन गहाण होती ती त्याला परत मिळवून देत त्यांच्या हाती कागदपत्रे ठेवली. जमीन परत मिळाल्याचा आनंद आणि नेत्याने अडचणीत दिलेला आधार पाहून शिवसैनिक आणि त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. राजकारणात अनेक नेते आले, गेले त्यांच्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या कार्यकर्त्याला आश्वासने दिली जातात, पण ती पूर्ण कधीच केली जात नाहीत.

Madhav jadhav, Shrikant Shinde
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडल्या राजकीय घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर

पत्नीला निवडणुकीत उभे केले, त्यासाठी जमीन विकली, पण निसटता पराभव झाला. आर्थिक संकटात सापडलो होतो, 13 मे रोजी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना या शिवसैनिकाने त्यांची भेट घेतली. आपली विवंचना त्यांना सांगितली. त्यानंतर काही दिवसातच थेट विकलेल्या जमीनीचे कागदपत्र माझ्या हाती देत त्यांनी मला ती परत मिळवून दिली. त्यांच्यासारखा दिलदार नेता मी आजपर्यंत पाहिला नाही, अशा शब्दात शिवसैनिकाने त्यांचे आभार मानले.

Madhav jadhav, Shrikant Shinde
MLC Election News : विधानपरिषदेचा धुरळा : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भाजपचे वर्चस्व; संभाजीनगर-जालना मतदारसंघात कमळ फुलणार?

भोकर नगरपरिषदेच्या वार्ड क्रमांक दोनमधून शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena) तालुकाप्रमुख माधव वडगावकर यांच्या पत्नी लक्ष्मी माधव जाधव या शिवसेनेच्या उमेदवार होत्या. परंतु त्यांचा अवघ्या 55 मतांनी भाजप उमेदवाराकडून पराभव झाला होता. 2025 मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर खासदार श्रीकांत शिंदे हे 13 मे रोजी नांदेड जिल्ह्यात आढावा घेण्यासाठी आले, तेव्हा त्यांना आपल्या कार्यकर्त्याने निवडणुकीसाठी शेती विकल्याची माहिती मिळाली. त्यांनी माधव जाधव वडगावकर यांना बोलावून घेत विचारपूस केली आणि दोन आठवड्यातच वडगावकर यांना त्यांनी विकलेली जमीन पुन्हा मिळवून दिली.

Madhav jadhav, Shrikant Shinde
NCP Politics : राष्ट्रवादीमध्ये धुसफूस, शहराध्यक्ष सुभाष जगतापांच्या विरोधात थेट सुनेत्रा पवारांकडे तक्रार; 'आधी स्वतः पदे भोगली, आता...'

पक्षासाठी लढला, त्याची निष्ठा-त्याग मोठाच!

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील शिवसैनिक माधव वडगावकर यांना आलेला हा अनुभव निश्चितच सुखावणारा आहे. या संदर्भात स्वतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी माधव वडगावकर याची आणि आपली भेट झाल्याचे सांगितले. त्यांच्याशी संवाद साधताना नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकी दरम्यान पक्षासाठी झोकून देत काम करताना स्वत:ची तब्बल 22 गुंठे शेती विकल्याची गोष्ट समजली.

Madhav jadhav, Shrikant Shinde
Maharashtra politics : शिंदेंच्या सेनेत निधीवाटपावरून खदखद व्यक्त होताच ठाकरेंच्या नेत्याचा दावा; म्हणाले,'मोठी उलथापालथ होऊन काही नेते पक्ष सोडतील'

निवडणुकीत अगदी निसटता पराभव झाला, पण पक्षनिष्ठा आणि शिवसेनेवरील प्रेम मात्र तसूभरही कमी झालं नव्हतं. त्यांच्या डोळ्यांतील वेदना आणि पक्षासाठी केलेला त्याग पाहून मन अस्वस्थ झालं. पक्षासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कार्यकर्त्याच्या आयुष्यात अन्याय राहू द्यायचा नाही, ही भावना मनात कायम होती. त्याच क्षणी ठरवलं… माधवजींना त्यांची जमीन पुन्हा मिळवून द्यायचीच. त्यानंतर तातडीने प्रयत्न सुरू केले आणि अखेर त्यांची विकलेली शेती पुन्हा त्यांच्याकडे सुपूर्द केली.

Madhav jadhav, Shrikant Shinde
Maharashtra Politics Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडल्या राजकीय घडामोडी? जाणून घ्या एका क्लिकवर

आज माधवजी भेटायला आले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यांतील समाधान आणि त्यांनी व्यक्त केलेले आभार हे कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहेत. कारण शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली काम करणारी शिवसेना ही फक्त राजकारण नाही, तर आपल्या माणसांसाठी जीवापाड उभं राहणारं एक कुटुंब आहे.

Madhav jadhav, Shrikant Shinde
Maharashtra News Live Update: अमित शाहांसोबतच्या बैठकीनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,10 लाख टन कांदा...

कार्यकर्ते पक्षासाठी स्वत:चं सर्वस्व पणाला लावतात, त्यामुळे त्यांच्या कठीण काळात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं, हे कर्तव्यच आहे. एखाद्या शिवसैनिकाच्या आयुष्यात पुन्हा आनंद येताना पाहणं यापेक्षा मोठं समाधान दुसरं असूच शकत नाही, अशा शब्दात श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Madhav jadhav, Shrikant Shinde
Maharashtra MLC election: विधान परिषदेच्या जागावाटपावरून महायुतीमध्ये रणकंदन! संख्याबळावरून मित्रपक्षात जोरदार खडाजंगी; उपमुख्यमंत्र्यांच्या 'ठाण्या'सह 7 जागांवरून ठिणगी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com