Datta Gade Sarkarnama
पुणे

Swargate Rape Case Update ; मंगळवारी रात्रभर गुनाटमध्ये राहिलेला दत्ता गाडे बुधवारी सकाळीच पसार झाला; 200 पोलिस मागावर, उसात लपल्याचा संशय

Datta Gade News : पुण्यातून तो शिरूर बसस्थानकात आल्यानंतर त्याला अनेकांनी पाहिले. पण काही झालेच नाही, असे दाखवत तो निघून गेला, असे शिरूर बस स्थानकातील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

नितीन बारवकर

Pune, 27 February : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या शोधासाठी गुनाटमध्ये तब्बल दोनशेहून अधिक पोलिस दाखल झाले आहेत. त्यांनी दिवसभर तपास करूनही गाडे पोलिसांना मिळू शकलेला नाही. गाडे हा उसाच्या फडात लपला असण्याची शक्यता गृहीत धरून श्वानपथकाच्या माध्यमातून पोलिसांनी तपास केला. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत तो पोलिसांना सापडला नव्हता.

दरम्यान, स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्ता गाडे (Datta Gade) हा थेट गावी गुनाटला गेला होता. मंगळवारी रात्रभर तो घरी होता. मात्र, बुधवारी सकाळपासून वृत्तवाहिन्यांवरून त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध होताच गाडे याने घरातून पळ काढल्याचे पुढे आले आहे. गुन्ह्याच्या वेळी त्याच्या पायात असलेले बूटही गाडेच्या गुनाटमधील घरातून जप्त करण्यात आले आहेत.

स्वारगेट बसस्थानकातील (Swargate Bus Stand ) अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून पुणे शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी दत्ता गाडे हा याने स्वारगेट बसस्थानकात एका तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तो गावी गेला हेाता. पुण्यातून तो शिरूर बसस्थानकात आल्यानंतर त्याला अनेकांनी पाहिले. पण काही झालेच नाही, असे दाखवत तो निघून गेला, असे शिरूर बस स्थानकातील काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

घरी गेल्यानंतर मंगळवारी रात्रभर तो गुनाटमध्ये होता. मात्र, बुधवारी सकाळी वृत्तवाहिन्यामधून बातम्या प्रसिद्ध व्हायला लागताच त्यांनी गुनाटमधून पलायन केले, असे पोलिस तपासात पुढे आले आहे.

दत्ता गाडे याने मोबाईल बंद केल्यानंतरचे मोबाईल लोकेशन हे गुनाट परिसरामध्येच दाखवत आहेत, त्यामुळे तब्बल 200 पोलिसांचा फौजफाटा गुनाटमध्ये दाखल झालेला आहे. परिसरातील उसाच्या शेतात तो लपून बसल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे ड्रोन कॅमेरे आणि श्वानपथकाच्या साहाय्याने त्याचा माग काढला जात आहे. दिवसभर सगळीकडे शोधाशोध करूनही दत्ता गाडे पोलिसांना मिळू शकलेला नाही. मात्र पोलिसांची पथके शोधासाठी गावात ठाण मांडून बसलेली आहेत.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT