Swarget Rape Case : स्वारगेट अत्याचाराच्या घटनेवरून विरोधी पक्ष आक्रमक; वडेट्टीवार विधानसभेत नेणार प्रकरण

Vijay Wadettiwar : खरं तर गृह खात्याची इभ्रत रोजच चाललेली आहे. गृहविभागाची लक्तरे रोजच वेशीला टांगली जात आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न निर्माण हेात आहे.
Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 27 February : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात घडलेल्या अत्याचाराच्या घटनेवरून विरोधी पक्ष प्रचंड आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वारगेट बसस्थानकात आंदोलन करण्यात आले, तर दुसरीकडे, काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी गृहखात्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. गृहविभागाची लक्तरे रोजच वेशीला टांगली जात आहेत, राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित करत स्वारगेट अत्याचाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करणार असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

स्वारगेट बसस्थानकात (Swarget Bus Stand) एका युवतीवर तरुणाने अत्याचार केला आहे. त्यावरून विरोधी पक्षांकडून सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. याबाबत वडेट्टीवार म्हणाले, स्वारगेट बस स्थानकात झालेल्या घटनेची जबाबदारी त्या विभागाने आणि सरकारने स्वीकारली पाहिजे. कारण, घटना घडली तेव्हा तिथं असलेली यंत्रणा काय करत होती? तिथे जे साहित्य मिळाले, त्यावरून आगारातील चार बस ह्या महिलांचे शोषण करण्यासाठी वापरल्या जात हेात्या, असा प्रश्न निर्माण होत आहे.

स्वारगेट आगारात 20 सिक्युरिटी गार्ड असताना एका तरुणीवर अत्याचार होतो आणि सरकार कारवाई करू म्हणून नुसते थाप्पा मारत असते. खरं तर गृह खात्याची इभ्रत रोजच चाललेली आहे. गृहविभागाची लक्तरे रोजच वेशीला टांगली जात आहेत. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे का, असा प्रश्न निर्माण हेात आहे, असेही विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Vijay Wadettiwar
Pune Shivshahi Bus case : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी गाडे याला पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षीस जाहीर

ते म्हणाले, आम्ही शक्ती कायदा आणण्याची तयारी केली होती. मात्र, नव्याने आलेल्या सरकारने तो शक्ती कायदा लागू केलेला नाही. महिला सुरक्षेची या सरकारला अजिबात चिंता नाही. सत्तेमध्ये मश्गुल झालेले हे सरकार आहे. सत्ता आणि संपत्ती गोळा केली जात आहे, त्यामुळे स्वारगेट अत्याचार प्रकरणाचा मुद्दा मी विधानसभेत उपस्थित करणार आहे.

राज्यात अत्याचाराचा घटना वारंवार घडत आहेत. पण, या घटनांबाबत सरकार गंभीर आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. एखादी घटना घडली, तर आम्ही कडक कारवाई करू, असे सरकारकडून सांगितले जाते. पण, ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत. त्याबाबत सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, खरा प्रश्न आहे, असेही वडेट्टीवार यांनी नमूद केले.

Vijay Wadettiwar
Pune Swaragate Bus Stand : "हे पाहून जीव जळतोय..." स्वारगेट ST स्थानकात तोडफोड केलेल्या वसंत मोरेंना उद्धव ठाकरेंचा फोन, म्हणाले...

सरकारला आमचा इशारा आहे की, गृहखात्यात जे काही चाललं आहे. गृहखात्याचा धाकच राहिलेला नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचे दिसून आले आहे, असेही ते म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com