Swati Mohol met Fadnavis Sarkarnama
पुणे

Swati Mohol met Fadnavis : शरद मोहोळ हत्या प्रकरणी स्वाती मोहोळ यांनी घेतली फडणवीसांची भेट, म्हणाल्या...

Mayur Ratnaparkhe

Pune News : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची शुक्रवारी दुपारी कोथरुडमधील सुतारदरा भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर भरदिवसा गोळ्या झाडल्याने कोथरुडसह संपूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडाली. हल्ल्यानंतर गुंड मोहोळला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्याला मृत घोषित केले गेले.

दरम्यान, या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने पथके तयार करून संपूर्ण यंत्रणा कामाला लावली आणि अवघ्या काही तासांमध्ये मुख्य आरोपीसह आठ जणांना ताब्यातही घेतलं आहे. यानंतर रविवारी शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांची भेट घेतली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी स्वाती मोहोळ यांनी फडणवीसांकडे 'मला न्याय मिळावा, हल्लेखोरांवर लवकरात लवकर कारवाई व्हावी. अशी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे स्वाती मोहोळ या भाजप पुणे शहर महिला आघआडीच्या सरचिटणीस आहेत. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी एप्रिल 2023मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर स्वाती मोहोळ यांच्या पाठोपाठ शरद मोहोळ सुद्धा राजकारणत प्रवेश करणार होता, अशीही चर्चा होती.

आतापर्यंत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या खुनाचा कट महिन्याभरापूर्वीपासून शिजत होता. यामध्ये प्रामुख्याने शरद मोहोळ याच्याजवळचे साथीदार कटकारस्थान रचत होते. आपल्या पाठीमागे शिजत असलेल्या कटाचा कोणताही सुगावा शरद मोहोळ(Sharad Mohol) याला नव्हता. कारण दहा वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा कट करण्यात येत होता. प्रकरणातील मुन्ना ऊर्फ साहिल पोळेकर वीस वर्षांचा तरुण यामध्ये प्रमुख मारेकरी आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT