Devendra Fadnavis Vs Supriya Sule : 'माझी जेवढी काळजी सुप्रिया सुळे करतात त्याच्या 10 टक्के जरी..' ; फडणवीसांचा टोला!

Vijay Wadettiwar : 'विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला, तरी...' असंही फडणवीस म्हणाले आहेत.
Devendra Fadnavis Vs Supriya Sule
Devendra Fadnavis Vs Supriya SuleSarkarnama
Published on
Updated on

Pune News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात मीडियाशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. राज्यात गुन्हेगारी वाढत असल्याचे विधान सुप्रिया सुळे यांनी केले होते.

शिवाय, फडणवीसांवर अन्याय होत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं, त्यावरही फडणवीसांनी टोला लगावला आहे. पुणे भाजपच्या नवीन कार्यालयास फडणवीसांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी ते बोलत होते.

सुप्रिया सुळे(Supriya Sule) म्हणतात तुमच्यावर अन्याय होतोय, 105 आमदार असूनही तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही. टीव्हीवर केवळ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवारच दिसतात. फडणवीस केवळ विमानतळारच दिसतात, असं म्हणत माध्यम प्रतिनिधीने प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारल्यावर फडणवीस म्हणाले, 'माझी जेवढी काळजी सुप्रिया सुळे करतात, त्याच्या दहा टक्के जरी योग्यवेळी पवारांनी केली असती तर देखील चित्र वेगळं राहीलं असतं.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devendra Fadnavis Vs Supriya Sule
Supriya Sule: अजितदादा "बच्चा" म्हणाल्यानंतर, सुप्रिया ताई म्हणाल्या, दादा "सिनिअर सिटीजन"

याशिवाय, सुप्रिया सुळेंनी वाढत्या गुन्हेगारीवरून तुमच्यावर टीका केली आहे, फडणवीस (Devendra Fadnavis)गृहमंत्री होतात तेव्हा राज्यातील गुन्हेगारी वाढते असं त्यांनी म्हटलं आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, 'त्यांचा गृहमंत्री होता त्यावेळी किती आलबेल होतं. त्यावेळी अंबानींच्या घऱासमोर बॉम्ब ठेवला जात नव्हता. त्यावेळी गृहमंत्र्यांवर 100 कोटींचे आरोप लागत नव्हते. त्यावेळी साक्षीदारांच्या हत्या होत नव्हत्या. किती चांगलं काम होतं आणि त्यावेळी वाझे तर लादेन नव्हताच. त्यामुळे आता यावर काय उत्तर देणार? भूमिका बदलत असतात.'

तर मुंबईत अजित पवार(Ajit Pawar) गटाचा मेळावा झाला, त्या ठिकाणी बॅनरवर नवाब मलिकांचा फोटो लावला गेला होता. यावरून सुप्रिया सुळेंनी सवाल केला आहे, या संदर्भात फडणवीस म्हणाले 'माझी भूमिका पक्की आहे आणि जी माझी भूमिका आहे, तीच भाजपची भूमिका आहे.' तसेच, मराठा आरक्षणाचे सर्वेक्षण किती दिवसांत पूर्ण होणार? असा प्रश्न विचारला असता फडणवीसांनी म्हटलं की, सगळं योग्य वेळी होईल. असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Devendra Fadnavis Vs Supriya Sule
Raj Thackeray : 'मी शरद पवारांना वाकून नमस्कार करेल', राज ठाकरे म्हणाले...

याचबरोबर तलाठी परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांनी केला आहे, यावर उत्तर देताना फडणवीसांनी सांगितले की, 'विजय वडेट्टीवारांनी कुठलाही पुरावा दिला. तर निश्चित आम्ही चौकशी करू. नुसत्या वक्तव्यांनी चौकशी करता येत नाही.

आज इतक्या मोठ्याप्रमाणात महाराष्ट्रात आम्ही परीक्षा घेतल्या, पारदर्शक पद्धतीने आम्ही या ठिकाणी पूर्णपणे सगळ्या परीक्षा घेतल्या आहेत. पण कुठल्याही परीक्षेत कोणीही जर पुरावा दिला. तर ती परीक्षाही रद्द केली जाईल आणि त्यावर कारवाई सुद्धा केली जाईल.त्यामुळे त्यांनी पुरावे द्यावेत.'

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com