Katewadi Maratha Andolan  Sarkarnama
पुणे

Katewadi Maratha Andolan : काटेवाडीकरांची अजितदादांकडे मोठी मागणी; फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या; नाही तर त्यांची साथ तरी सोडा

Ajit Pawar News : जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ रविवारी सकल मराठा समाजाच्या वतीने काटेवाडी (ता. बारामती) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Vijaykumar Dudhale

Baramati News : अजितदादा, तुम्ही एक तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा तरी घ्या, नाही तर त्यांची साथ तरी सोडा. राज्यातील सकल मराठा समाज तुमच्याकडे खूप आशेने बघतो, अशी आग्रहाची मागणी काटेवाडी येथील तरुणांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. (Take resignation of Fadnavis; If not, leave their support: Demand of Katewadikars to Ajit Pawar)

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. ३ सप्टेंबर) सकल मराठा समाजाच्या वतीने काटेवाडी (ता. बारामती) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी बोलताना काटेवाडी येथील तरुण कार्यकर्ते स्वप्निल काटे यांनी अजित पवारांकडे गृहमंत्री फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

स्वप्निल काटे म्हणाले की, जालन्यातील मराठा आरक्षणाच्या आंदोलकांवर पोलिसांकडून जो लाठीहल्ला करण्यात आला आहे. त्याचा काटेवाडी ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या वेळी गावातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही आंदोलन केले, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचे फोटो लावले होते. अजितदादांचा फोटो का लावला नाही, असे आम्हाला विचारण्यात आले. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्या दोघांचा फोटो असणं स्वाभाविक आहे, असेही काटे यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले की, जालन्यात अंतरवाली सराटी येथे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यावरील गुन्हे सरकारने त्वरित मागे घ्यावेत. कारण, त्या तरुण मुलांचं आयुष्य बरबाद होईल, अशी आमची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT