Sharad Pawar, Umesh Patil, Sunil Tatkare
Sharad Pawar, Umesh Patil, Sunil Tatkare sarkarnama
पुणे

Tatkare-Pawar News : तटकरे, पवार भेटीबाबत उमेश पाटलांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, हा तर योगायोग....

Umesh Bambare-Patil

Pune News : शरद पवार, सुनील तटकरे व जयंत पाटील हे एकाच हॉटेलमध्ये असणे हा केवळ योगायोग असून पवार व तटकरे भेट झाली की नाही हे तटकरेच सांगू शकतील, पण आम्ही त्यांच्या दारातच उभे नाही, त्यामुळे परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यांची दार आणि घरही मोकळ आहे. त्यामुळे त्यांच्याकडे कोण जाणार असा सवाल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे.

एका हॉटेलमध्ये शरद पवार व सुनील तटकरे यांची भेट झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे. यावर अनिल देशमुख यांनी वक्तव्य केलं होते. त्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे. उमेश पाटील यांनी म्हटले की, सुनील तटकरे आणि शरद पवार, जयंत पाटील हे एकाच हॉटेलमध्ये असणे हा केवळ योगायोग आहे.

शरद पवार यांची सुनील तटकरे यांच्याबरोबर भेट झाली की नाही, याबाबत तटकरेच सांगू शकतील. मात्र, हॉटेलच्या लॉबीमध्ये तटकरे यांची काही कार्यकर्त्यांची भेट झाल्याचे एवढेच अनिल देशमुख यांनी म्हटले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात परत जाण्याबाबतच्या प्रश्नावर उमेश पाटील म्हणाले, आम्ही त्यांच्या दरातच उभे नाही. तर परत घेण्याचा प्रश्नच येत नाही. परत जाण्यासाठी आम्ही त्यांच्या दरात गेलेलो नाही.

त्यांची दर मोकळी असून त्यांचे घरही मोकळे आहे, त्यामुळे त्यांच्याकडे कोण जाणार, असा प्रश्न श्री. पाटील यांनी उपस्थित केला. छगन भुजबळांच्या नाराजीवर ते म्हणाले, नाशिकमध्ये उमेदवारी डावलल्यामुळे छगन भुजबळ निश्चितपणे नाराज आहेत. ते नाराज असले तरी एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी ते एकनिष्ठपणे काम करत आहेत.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

फडणवीसांचा दिलदारपणा...

⁠⁠सिंचन घोटाळ्यात अजित पवार यांच्यावरील एकही आरोप सिद्ध झाला नाही, असे सांगून उमेश पाटील म्हणाले, सर्व तपासणी यंत्रणा आणि चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या समित्या यांनी अजित दादांना क्लीन चीट दिली आहे. ⁠अजित दादा सिंचन घोटाळ्यात दोषी नाहीत हे मान्य करण्याचा मनाचा दिलदारपणा देवेंद्र फडणवीस यांनी दाखवला आहे.

Edited By : Umesh Bambare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT