Shivsena Leader join NCP Sarkarnama
पुणे

Ambegaon NCP News : आंबेगावात शिंदे गटाला धक्का; युवा सेनेच्या जिल्हा सरचिटणीसांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pune Politics : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले.

सुदाम बिडकर

Ambegaon News : आंबेगाव तालुक्यात शिवसेनेला (शिंदे गट) खिंडार पडले असून, युवा सेनेचे पुणे जिल्हा सरचिटणीस काळूराम लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. (Yuva Sena district general secretary Kaluram Lokhande joins NCP)

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील नऊ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. येत्या सोमवारपासून (ता. १६ ऑक्टोबर) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

लोखंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाचा कार्यक्रम भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर झाला. लोखंडे यांच्या समवेत त्यांचे सहकारी विठ्ठल ढोबळे आणि इतर सहकारी यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. जिल्हा सरचिटणीस लोखंडे यांचे गाव पारगाव असून, त्या गावचीही निवडणूक लागलेली आहे.

दरम्यान, महायुतीमधील शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून गळाला लावण्यात आले आहे. त्याचे काय पडसाद उमटतात, हे पाहावे लागेल. कारण महाविकास आघाडीच्या काळात पारनेर नगर परिषदेच्या नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत मतभेद निर्माण झाले होते.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी लोखंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि पुढील कारकिर्दीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे संचालक शिवाजीराव ढोबळे, शरद बँकेचे संचालक दौलतराव लोखंडे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT