Mumbai NCP : शरद पवार गटाची निवडणूक मोर्चेबांधणी; मुंबईचे अध्यक्षपद सोपविणार एकनिष्ठ महिला नेत्याकडे!

Sharad Pawar Group : राखी जाधव या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात.
Rakhi Jadhav
Rakhi JadhavSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने मुंबई अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची नियुक्ती केल्यानंतर शरद पवार गटानेही मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्षपद एका महिला नेत्याकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार मुंबईच्या विद्यमान कार्याध्यक्ष राखी जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षपदी, तर युवक अध्यक्षपदी अमोल मातेले यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. (Rakhi Jadhav will be elected as the Mumbai President of NCP)

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून संघटना बांधणीकडे लक्ष दिले जात आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवर भर देण्यात येत आहे. आपल्या गटाकडे ताकदवान पदाधिकारी खेचण्याची स्पर्धा या दोन्ही गटांत लागली आहे. अजित पवार गटाने मुंबईची धुरा भुजबळांकडे दिली आहे, त्यातूनच मुंबईच्या अध्यक्षपदी माजी खासदार समीर भुजबळ यांची निवड करण्यात आलेली आहे.

Rakhi Jadhav
Maratha Reservation : प्रस्थापित मराठे ७० वर्षे गांजा ओढत होते, की गोट्या खेळत होते?; खोतांचा निशाणा कुणावर?

दरम्यान, माजी मंत्री नवाब मलिक यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. तुरुंगात असूनही मलिक यांच्यासाठी मुंबईचे अध्यक्षपद रिक्त ठेवण्यात आले होते. मात्र, नवाब मलिक हे जामिनीवर कारागृहाच्या बाहेर आलेले आहेत. त्यांनी अद्याप आपली राजकीय भूमिका स्पष्ट केलेली नाही. मात्र, ते अजित पवार गटाकडे झुकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन शरद पवार गटानेही हालचाली वाढवल्या आहेत.

मुंबई महापालिका आणि लोकसभेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन शरद पवार गटानेही आता मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा पक्षाच्या विद्यमान कार्यकारी अध्यक्ष राखी जाधव यांच्याकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी अमोल मातेले यांची वर्णी लागणार आहे, त्याबाबतची घोषणा पक्षाच्या मेळाव्यात होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Rakhi Jadhav
Kolhapur Politics : शिंदे गटावर भाजप कब्जा करणार? कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये भाजपची प्रचारात बाजी

राखी जाधव या मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. अनेक वर्षांपासून त्या नगरसेवक म्हणून काम पाहत आहेत. एकसंघ राष्ट्रवादी असतानाही पक्षाने त्यांच्यावर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतरही राखी जाधव या शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्या आहेत. त्यामुळे शरद पवार गटाने मुंबईची धुरा एकनिष्ठ असणाऱ्या राखी जाधव यांच्याकडे सोपविण्याचा निर्णया घेतला आहे.

Rakhi Jadhav
MP Election Congress List : मध्य प्रदेशसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर; कमलनाथांसह 144 उमेदवारांची घोषणा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com