Vanraj Andekar Sarkarnama
पुणे

Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकर यांचा खून ; पुण्यातील नाना पेठेत घडला थरार!

Vanraj Andekar Death in Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते वनराज आंदेकर ; पाच ते सात हल्लेखोरांनी केला गोळीबार

Mayur Ratnaparkhe

PUNE Gangwar News : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. पुण्यातील नाना पेठेत हा गोळीबाराचा थरार घडला. गोळीबारानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

एकीकडे शहरात विशेष करून शहराच्या मध्यवर्ती भागांमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरने डोकं वर काढल्याचेही बोललं जात आहे.

रास्ता पेठ रविवार पेठ प्रभाग क्रमांक 17 मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर(Vanraj Andekar) हे रात्री साडेआठच्या सुमारास नानापेटीतील डोके तालीम परिसरात थांबले होते. यावेळी पाच ते सात अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावरती गोळीबार केला. पाच ते सहा गोळ्या त्यांच्यावरती झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

हल्ल्याची माहिती मिळताच गुन्हे पुणे शाखेने घटनास्थळी धाव घेतली. वैमान्यातून हा हल्ला झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. यादरम्यानच्या काही काळ परिसरातील लाईट गायब झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

वर्चस्वाच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही काळापासून नाना परिसरात आंदेकर टोळीचा दबदबा आहे. आणि याच वर्चस्व वादातून हल्ला झाल्या असल्याचं देखील बोललं जात आहे.

२०१७ सालच्या महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) तिकीटावर वनराज आंदेकर हे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या देखील २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकात आंदेकर हेही नगरसेवक होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT