Pune News, 29 March : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेले माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी शड्डू ठोकला आहे. मनसेत असतानाही त्यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता. मोरे यांची पाऊले आता वंचित बहुजन आघाडीच्या दिशेने पडताना दिसत आहेत. लोकसभा निवडणूक लढविण्याची रणनीती आज पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीत ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे (Vasant More) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेना, काँग्रेस नेत्यांची भेट घेतली होती. मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha Constituency) तिकीट मिळावे, यासाठी नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मोरे आज प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची भेट घेणार आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीसंदर्भात वसंत मोरे म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांच्या माध्यमातून मी प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना भेटण्यासाठी जात आहे. पुण्याची उमेदवारी कशा पद्धतीने असावी. मला कशा पद्धतीने मदत होईल, यासाठी मी आंबेडकर यांना भेटत आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार आणि इतर नेत्यांनाही मी भेटलो आहे. त्यांच्या भेटीनंतर मला काय फलित मिळाले, हे सर्वांच्या समोर आहे. मला पुण्यात निवडणूक लढवायची आहे, मला तुम्हा सर्वांची मदत हवी आहे, असे मी त्यांना सांगितले होते. पण काही विषयांच्या बाबत काय घडलं, हे मी निवडणुकीच्या प्रचारात बोलेन, असेही मोरे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, पुण्याची निवडणूक ही मला जिंकण्यासाठी लढायची आहे. त्यासाठी मी काही गणितं आखत आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या पक्षाची ताकद पुणे शहरात आहे. आज त्याच संदर्भाने त्यांना राजभवनात भेटण्यासाठी जात आहे. वंचितनेही मला उमेदवारी दिली नाही, तर मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे.
माझी पुणे शहरासाठीची भूमिका काय आहे. शहरासाठी मला काय करायचे आहे, ही माझी भूमिका मी भेटलेल्या प्रत्येक नेत्यापुढे मांडत आहे. शरद पवार, संजय राऊत, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांच्या समोर मी माझी भूमिका मांडली आहे. त्याच पद्धतीने आज बाळासाहेब आंबेडकर यांच्यासमोर मी माझी भूमिका मांडणार आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.