Solapur, 28 March : लोकसभा निवडणुकीसाठी मी उभी आहे. मात्र, भाजपच्या उमेदवाराकडून सुशीलकुमार शिंदे यांच्यावर टीका केली जात आहे. तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माझ्याशी भिडा. माझ्या वडिलांनी संघर्ष केला आहे, त्यांच्यावर बोलताना लाज वाटली पाहिजे, असा हल्लाबोल काँग्रेसच्या उमेदवार तथा आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे उमेदवार, आमदार राम सातपुते यांच्यावर केला.
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. त्या मेळाव्यात बोलताना प्रणिती शिंदे यांनी राम सातपुते (Praniti Shinde) यांच्यावर टीका केली. त्या म्हणाल्या, मागील १० वर्षांत भाजपने केवळ आश्वासने देण्याचे काम केले आहे. पण एकही आश्वासन पाळलेले नाही. भाजपकडून जनतेची फसवणूक करण्यात येत आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मी सोलापूरच्या जनतेची कामे करते, त्यामुळे मला आमदार म्हणून तीन वेळा निवडून दिले आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात (Solapur Lok Sabha Constituency) सध्या भाजपचे चार, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एक आमदार आहेत. पण, जनतेच्या प्रश्नावर कोणीही आवाज उठवत नाही. विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार असून, लोकांच्या समस्येवर मीच एकटी बोलते, असेही प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, ही माझ्या एकटीची लढाई नाही. ही सोलापूरकरांची आणि त्यांच्या विकासासाठीची लढाई आहे. लोकशाही आणि संविधान वाचविण्याचा हा लढा आहे. आता माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचेही कार्यकर्ते असणार आहेत, त्यामुळे माझा उत्साह आणखी वाढला आहे.
जोमाने प्रचार करण्याची शिवसैनिकांची शपथ
काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना उद्धव ठाकरे गटानेही पाठिंबा देत विजयी करण्याचा निर्धार केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिताऱ्यांचा सोलापूरमध्ये मेळावा झाला. त्या मेळाव्यात आमदार शिंदे यांचा एकजुटीने आणि जोमाने प्रचार करण्याची शपथ सर्व शिवसैनिकांनी घेतली.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.