Dattatray Walse Patil-Vivek Walse Patil Sarkarnama
पुणे

Pune ZP : आजोबानंतर नातूही त्याच खुर्चीत बसणार; विवेक वळसे पाटील दुसऱ्यांदा पुणे झेडपीचे उपाध्यक्ष

Vivek Walse Patil Vice President : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे, तर उपाध्यक्षपदी विवेक वळसे पाटील यांची निवड झाली. वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा संधी मिळत कुटुंबीय परंपरा कायम राहिली.

डी. के. वळसे पाटील

Manchar, 18 March : पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अनेक मातब्बरांना मागे टाकून अध्यक्षपदी दौंडचे वीरधवल जगदाळे, तर विवेक वळसे पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे विवेक वळसे पाटील यांना दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. विवेक वळसे पाटील यांचे आजोबा आणि माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील यांनीही अर्थ आणि बांधकाम सभापती म्हणून काम केले आहे. त्यामुळे आजोबानंतर नातू विवेक वळसे पाटलांना झेडपीत महत्वाचे पद मिळाले आहे.

आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी सुमारे ४७ वर्षांपूर्वी (१९७९) पुणे जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम समिती सभापती म्हणून काम केले आहे. त्यानंतर आजोबा दत्तात्रेय वळसे पाटील यांच्यानंतर त्यांचे नातू विवेक प्रतापराव वळसे पाटील (Vivek Walse Patil ) यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. उपाध्यक्ष अर्थ आणि बांधकाम समितीचे सभापतिपद दिले जाते, त्यामुळे आजोबानंतर नातू त्याच खुर्चीत बसणार आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे बहुमत मिळाले होते, त्यामुळे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या झेडपीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याची प्रचंड उत्सुकता होती. अनेक दिग्गज या पदासाठी इच्छूक होते, त्यामुळे पक्षात स्पर्धाही तेवढीच हेाती.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या राजकीय रणनीतीमुळे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पाठिंब्यामुळे आंबेगाव तालुक्याला पुन्हा उपाध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजितदादा यांच्यानंतर सुनेत्रा पवारांनीही वळसे पाटलांच्या आंबेगावला झुकते माप दिल्याचे बोलले जात आहे.

माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे वडिल दत्तात्रय वळसे पाटील यांनी १९७९ ते १९८१ या कालावधीत पुणे जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम पाहिले होते. त्यांच्या निवडीतही शरद पवार यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. पुढे आंबेगावातील सुभाष मुरमारे यांना समाज कल्याण सभापतिपद मिळाले होते.

जिल्हा परिषद अध्यक्षपदी शैलजा ढोबळे (१९९८-९९) यांना, अरुण गिरे यांना (२००७ ते २००९ या) उपाध्यक्षपदाची संधी मिळवून देण्यात माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विवेक वळसे पाटील यांनी यापूर्वी उपाध्यक्ष म्हणून केले आहे. त्यामुळे आंबेगावला तिसऱ्यांदा उपाध्यक्षपद मिळाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT