Jayant Patil : संजयकाकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं, तिकडच्या हालचाली त्यांनीच सांगितल्या : सांगली ZP अध्यक्षपदावर विजय मिळवताच जयंत पाटलांचा गौप्यस्फोट

Sangli ZP President election : भाजपकडून सर्व सदस्यांसोबत उमेदवारी दाखल करण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासोबत माजी खासदार संजय पाटील देखील सभागृहात दाखल झाले होते.
Sanjay Patil, Jayant Patil
Jayant Patil speaks to the media after the Sangli ZP President election win, highlighting Sanjay Patil’s strategic role.Sarkarnama
Published on
Updated on

Sangli News, 18 Mar : सांगली जिल्हा परिषदेत अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या रणनीतीमुळे या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या (शरद पवार) संगीता पाटील यांनी भाजपच्या स्वप्नाली मासाळ यांचा 9 मतांनी पराभव केला आहे. तर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी या विजयामागे संजयकाका पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचा खळबळजनक खुलासा केला आहे.

संजयकाकांना आम्हीच भाजपकडे पाठवलं होतं. तिकडच्या हालचाली त्यांनीच आम्हाला सांगितल्या, असं जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. पाटील म्हणाले, "काल आम्ही सत्ता स्थापन करू याबाबत शंका व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आम्ही माजी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडे पाठवलं. त्यांनी भाजपच्या गोठात काय हालचाली सुरु आहेत याची माहिती आम्हाला दिली. त्याबाबत आम्ही संजय काका पाटील यांचे आभार मानतो."

Sanjay Patil, Jayant Patil
PMC News : दोन जणांचे अर्ज बाद? स्वीकृत नगरसेवक होण्याची संधी हुकणार; पुणे महापालिकेत आज निवड

तर एक खासदार विशाल पाटील हे आमच्यासोबत उघड होते. तर दुसरे खासदार संजयकाका पाटील छुपे राहून आमची मदत करत होते, असा दावाही पाटील यांनी केला. तर आमच्यावर कोण काय टीका करते याकडे आम्ही कधी लक्ष दिले नाही. आम्हाला केवळ आमच्या उद्दिष्टापर्यंत पोहचायचे होते, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता संजयकाका यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण भाजपकडून सर्व सदस्यांसोबत उमेदवारी दाखल करण्यासाठी आमदार सत्यजित देशमुख, गोपीचंद पडळकर, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासोबत माजी खासदार संजय पाटील देखील सभागृहात दाखल झाले होते.

Sanjay Patil, Jayant Patil
Bhigwan case : भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेखच्या काकाला अटक : आणखी दोन जुनी प्रकरणे समोर; नेमकं काय गौडबंगाल?

सभागृहात निवडीवेळीच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीपासून महाविकास आघाडीसोबत असलेले संजयकाका पाटील काही दिवसांपासून भाजपसोबत दिसत होते. आज त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 पैकी 2 सदस्यही भाजपच्या बाजूने गेले. तर शिवसेनेचे दोन सदस्य सभागृहात अनुपस्थित राहिले त्याचा महाविकास आघाडीला फायदा झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com