Pune ZP president selection : पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर; त्यापूर्वीच पंचायत समित्यांना मिळणार सभापती

Political News : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायात समितीच्या निवडणुका होऊन जवळपास तीन आठवड्यापेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. मात्र, झेडपी अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींची निवड कधी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती.
Former MLA Sangram Thopte’s political strategy reshapes Pune Zilla Parishad results as Bhor stakes claim for President post after four decades.
Former MLA Sangram Thopte’s political strategy reshapes Pune Zilla Parishad results as Bhor stakes claim for President post after four decades.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायात समितीच्या निवडणुका होऊन जवळपास तीन आठवड्यापेक्षा अधिकचा काळ लोटला आहे. मात्र, झेडपी अध्यक्ष व पंचायत समितीच्या सभापतींची निवड कधी होणार याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र शुक्रवारी निवडीचा कार्यक्रम प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच राज्यात निवडणुका पार पडलेल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्या निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 13 पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड 9 मार्च 2026 दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यातील हवेली, जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरुर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर, वेल्हे, मुळशी, मावळ या 13 तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड 9 मार्च रोजी करण्यात येणार आहे. तर पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड 16 मार्च 2026 दुपारी दोन वाजता करण्यात येणार आहे. या दोन्ही निवडणुकीवेळी पिठासीन अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत.

Former MLA Sangram Thopte’s political strategy reshapes Pune Zilla Parishad results as Bhor stakes claim for President post after four decades.
BJP News : अतिश दांडेगांवकरांचा भाजपात प्रवेश होताच प्रदेशाध्यक्षांनी दिला 'हा' शब्द

पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायात समितीच्या निवडणुकासाठी 7 फेब्रुवारीला मतदान पार पडले होते तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडली. पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी सत्तास्थापन करीत असताना महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या भाजप (BJP) व एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांना सॊबत घेणार का याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Former MLA Sangram Thopte’s political strategy reshapes Pune Zilla Parishad results as Bhor stakes claim for President post after four decades.
Shivsena Rajya Sabha: 'मातोश्री'तून मोठी अपडेट, ठाकरे गेम पालटणार; शरद पवार अन् काँग्रेसला धक्का देणारा शिवसेना आमदाराचा दावा समोर

पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडीचे आदेश आले असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापली 'फिल्डिंग' लावण्यास सुरुवात केली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, माजी आमदार रमेश थोरात यांचे पुत्र तुषार थोरात आणि बारामती पंचायत समितीचे माजी सभापती करण खलाटे यांची नावे चर्चेत आहेत.

Former MLA Sangram Thopte’s political strategy reshapes Pune Zilla Parishad results as Bhor stakes claim for President post after four decades.
Bjp Vs Shivsena : युती झाली, पण वर्चस्वाची लढाई पेटली! शिंदे सेनेच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत, भाजपचा अध्यक्षपदावरही डोळा

दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 73 पैकी 51 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी महायुतीच्या प्रयोगाची गरज नसल्याची भूमिका घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे एकहाती सत्ता स्थापन करण्याची मागणी केली आहे. याबाबत स्थानिक पक्षाच्या नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर ही भूमिका स्पष्टपणे मांडल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Former MLA Sangram Thopte’s political strategy reshapes Pune Zilla Parishad results as Bhor stakes claim for President post after four decades.
CM Eknath shinde यांनी पत्रकारांनाच सुनावले | Shivsen | BJP | sarkarnama video

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com