Narendra Modi_Minister's Convoy 
पुणे

Minister's Convoy: सामान्यांना दिलासा मिळणार? महाराष्ट्रात मंत्र्यांच्या ताफ्यांवर निर्बंधांचे संकेत; मोदींच्या आवाहनाचा परिणाम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून एक भाषण केलं यामध्ये त्यांनी देशातील नागरिकांना महत्वाचे आवाहन केले.

Sudesh Mitkar

Minister's Convoy: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला उद्देशून एक भाषण केलं यामध्ये त्यांनी देशातील नागरिकांना महत्वाचे आवाहन केले. यामध्ये पेट्रोल, डिझेल वापर कमी करा, खाद्यतेल कमी वापरा, सोने खरेदी टाळा तसेच परदेशी प्रवास टाळा, मेट्रो आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा, वर्क फॉर्म होम करा अशा सूचना केल्या आहेत.

यानंतर नागरिकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून या सगळ्या गोष्टींचा फक्त सामान्य नागरिकच करणार की देशातील नेते मंडळी, मंत्री देखील आपल्या दैनंदिन गोष्टींमध्ये बदल करणारा आहेत. असा प्रतिप्रश्न केला जात आहे. कारण एकीकडे पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेलं असताना दुसरीकडे मंत्र्यांच्या ताब्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गाड्यांची रेलचेल पाहायला मिळत आहे.

त्यामुळे आता मंत्री देखील आपल्या ताफ्याविना फिरणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, "पंतप्रधानांचं मी महाराष्ट्राच्या जनतेकडून जाहीर आभार मानतो. कारण त्यांच्याकडून एक सकारात्मक संदेश राज्याच्या जनतेला मिळाला आहे. इंधनाचा वापर कमी करण्यासाठी पेट्रोल, डिझेल या पर्यायाऐवजी इथेनॉलचा पर्याय आपल्यासमोर आहे. तसेच इतर स्वदेशी पर्याय आहेत, सोने खरेदीबाबत देखील अनेक पर्याय आहेत. देश जेवढं सोनं-चांदी निर्माण होत आहे तेवढेच आपण खरेदी केलं पाहिजे जेणेकरून परकीय चलन आपल्या देशातच राहील.

यासोबतच गॅसचा तुटवडा आपल्याला जाणवायलाच नको कारण परमेश्वराने आपल्याला इतकं मोठा सोलार दिला आहे. सौर ऊर्जेची शेगडी आपण वापरू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका स्वदेशी आहे आणि देशाने त्यांची भूमिका स्वीकारली आहे. तसंच मंत्र्यच्या ताफ्यांबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले, "आमच्या ताफ्याची आणि गाड्यांची काही काळजी करू नका, आम्हाला ताफा नसला तरी चालतो" या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून त्यावर योग्य तो निर्णय घेणार असल्याचा देखील बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT