Maharashtra ZP elections : 20 जिल्हा परिषदांच्या रखडलेल्या निवडणुकांबाबत आली नवी अपडेट : सुप्रीम कोर्टाने दिला पावसाळ्यातील मुहुर्त

OBC reservation issue News : 20 जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीची घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सोमवारी या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील 20 जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील ओबीसी आरक्षण वाढल्याने सुप्रीम कोर्टाने या ठिकाणच्या निवडणुका परत घेण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पहिल्या टप्यात 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर जवळपास 20 जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात निवडणुकीची घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सोमवारी या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी अपडेट समोर आली आहे.

सुप्रीम कोर्टात सोमवारी राज्यातील आरक्षणाअभावी रखडलेल्या 20 जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी पुढे ढकलली आहे. या प्रलंबित निवडणुकाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी बाजू मांडल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर कोर्टासमोर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

Election Commission
Maharashtra Politics Live Update : “त्यांना बोलण्याचा अधिकारच नाही, मुख्यमंत्र्यांची राहुल गांधींवर टीका

राज्यातील रखडलेल्या 20 जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच कोर्टातील सुनावणीवेळी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यानुसार आता येत्या काळात राजकीय नेत्यांची प्रतीक्षा संपली असून पुन्हा एकदा सुनावणी लांबणीवर पडली आहे.

Election Commission
BJP political gain : आम आदमी पक्ष फोडताच भाजप ऐतिहासिक स्वबळाच्या जवळ : राज्यसभेत एनडीएची गरज संपणार?

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर महाराष्ट्रातील 29 महापालिकांच्या निवडणुका झाल्या. तर दुसरीकडे त्यानंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुका 7 फेब्रुवारी रोजी झाल्या तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी पार पडली होती.

Election Commission
BJP News : भाजपकडून विधान परिषदेसाठी मराठवाड्यातील डझनभर नावांची चर्चा; संधी कोणाला मिळणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com