Raju Shetti Sarkarnama
राज्य

Sangali Swabhimani News : सांगलीत 'स्वाभिमानी'कडून 'वसंतदादा'चा 'काटा बंद'..!

Sugur Cane Rate March : ऊस दरासाठी कार्यकर्त्यांकडून आंदोलन ; पोलीस, कार्यकर्त्यांमध्ये झटापट

सरकारनामा ब्यरो

Sangali Swabhimani News : सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी अद्याप ऊसदर जाहिर न केल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसदरासाठी आज रविवार दि. १० रोजी उसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर धडक देत 'काटा बद' आंदोलन केले. यावेळी आक्रमक कार्यकर्त्यांकडून कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न झाल्याने पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली.

सांगलीत Sangali ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आठ दिवसांपूर्वी जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखानास्थळावर संघटनेने आंदोलन केले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी कारखानदारांनी बैठक घेऊन आठ दिवसांत तोडगा काढण्याची मुदत दिली होती. ती आज संपली असूनही तोडगा न निघाल्याने संघटनेने काटा बंद आंदोलन सुरु केले. यावेळी संघटनेने आक्रमक होत ऊस दर जाहीर करावा, अशी मागणी करत रविवारी सांगलीतील दत्त इंडिया संचलित वसंतदादा कारखान्यावर संघटनेने धडक देत कारखान्यात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला.

कारखान्याच्या मुख्य गेटवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करत करण्यात आली. पोलिसांनी आंदोलकांना गेटवरच थांबवल्यामुळे कार्यकर्ते आणि पोलिसांच्यामध्ये झटापट झाली. या ठिकाणी स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काटा बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कारखाना परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान, ऊस दरावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे Swabhimani Shetkari Sanghatna नेते राजू शेट्टी Raju Shetti आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्यामध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले. "ऊस दराच्या आंदोलनात प्रसिद्धीसाठी आमची नावे घेतली जातात.." अशी टीका जयंत पाटील यांनी केली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर "जयंत पाटील यांचे नाव घेऊन चर्चेत येण्याइतकी माझी अधोगती झाली नाही, जयंत पाटलांनी आपले ठेवायचे झाकून अन् दुसऱ्याचे बघायचे वाकून हे धंदे बंद करावेत.." अशा शब्दात राजू शेट्टी यांनी जयंत पटलांचा समाचार घेतला.

Edited By : Amol Sutar

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT