23th October in History Sarkarnama
विशेष

23rd October in History : अन् भाजपने केंद्रातल्या सरकारचा पाठिंबा काढला

23 October Dinvishesh : आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकि‍र्दीत सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात वादळ उठले होते. १९८९ मध्ये त्यांनी अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती कायदा अंमलात आणला.

Rashmi Mane

Dinvishesh: १९८९ च्या लोकसभा निवडणुका नॅशनल फ्रंटने भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर लढल्या आणि विश्वनाथ प्रताप सिंग देशाचे ७ वे पंतप्रधान बनले. त्या अगोदर ते दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मंत्रीमंडळात अर्थ आणि संरक्षण मंत्री होते.

त्याच काळात बोफोर्स प्रकरण बाहेर आले आणि सिंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि पूर्वीच्या जनता पक्षातील अनेक पक्षांचे विलिनीकरण करुन त्यांनी जनता दलाची स्थापना केली. याच जनता दलाच्या आघाडीचे सरकार भाजपच्या पाठिंब्यावर सत्तेवर आले होते.

आपल्या पंतप्रधान पदाच्या कारकि‍र्दीत सिंग यांनी मंडल आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशात वादळ उठले होते. १९८९ मध्ये त्यांनी अनुसुचित जाती आणि अनुसुचित जमाती कायदा अंमलात आणला.

दरम्यानच्या काळात राम मंदीराचे आंदोलन जोर धरु लागले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी रथयात्रेला सुरुवात केली होती. २३ ऑक्टोबर १९९० रोजी ही यात्रा बिहारमधील समस्तीपूर येथे पोहोचली. पंतप्रधान सिंग यांचा विरोध होता. त्यावेळी बिहारचे मुख्यमंत्री होते लालूप्रसाद यादव. त्यांच्या सरकारने समस्तीपूर येथे ही यात्रा अडवली आणि अडवानी यांना अटक केली.

हे समजताच त्याच दिवशी भारतीय जनता पक्षाने व्हि.पी. सिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार अल्पमतात आले. मात्र, व्हि. पी. सिंग यांनी राजीनाम्यास नकार दिला आणि संसदेत बहुमत सिद्ध करण्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर राष्ट्रपती आर. वेंकटरमण यांनी सिंग यांना बहुमत सिद्ध करण्याची सूचना केली.

23 rd october 2024 in history

त्यानुसार, ७ नोव्हेंबर १९९० रोजी संसदेचे एक दिवसाचे अधिवेशन बोलावले गेले. त्यात राष्ट्रीय आघाडी सरकारवर विश्वास व्यक्त करणारा ठराव १४२ विरुद्ध ३४६ मतांनी फेटाळण्यात आला. त्यामुळे सिंग यांना राजीनामा देण्यावाचून अन्य पर्याय उरला नाही. त्यानंतर बंडखोर जनता दलाचे नेते चंद्रशेखर यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.

१० नोव्हेंबर रोजी त्यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. काँग्रेसने त्यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. मात्र, आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याच्या आरोपावरून राजीव गांधी यांनी चंद्रशेखर यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर काही काळ ते काळजीवाहू पंतप्रधान राहीले. आपल्या पंतप्रधान पदाच्या काळात देशाचे सोने गहाण ठेवण्याचा निर्णय त्यांच्या सरकारने घेतला आणि देशाची बदनामी झाली होती.

दिनविशेष - २३ ऑक्‍टोबर

१८८२- भारतीय उद्योगपती वालचंद हिराचंद यांचा जन्म

१९२५ - राजस्थानचे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचा जन्म

१९४३ - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूरमझ्ये आझाद हिंद सेनेच्या झाशीची राणी ब्रिगेडची स्थापना केली.

१९४४ - दुसऱ्या महायुद्धात सोव्हिएटच्या रेड आर्मीचा हंगेरीत प्रवेश

१९४६ - संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली महासभा न्यूयाॅर्क येथे संपन्न

१९७३ - संयुक्त राष्ट्रांच्या निर्बंधांमुळे इस्त्रायल-सिरियामध्ये युद्धविराम

१९९७- जर्मनीचा योजेफ ब्यूज पुरस्कार सामाजिक कार्यासाठी किरण बेदी यांना जाहीर

१९९९ ज्येष्ठ कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ‘कबीर’ पुरस्कार जाहीर.

२००४ - जपानमधील भूकंपामध्ये ८५ हजार नागरिक बेघर

२०१२ - भारतीय वंशाची अमेरिकन अवकाशवीरांगना सुनीता विल्यम्सने अवकाशात शंभर दिवस पूर्ण केले.

२०१३ - क्रिकेटची गीता समजल्या जाणाऱ्या ‘विस्डेन’ने सार्वकालिक जागतिक कसोटी संघाची घोषणा करून त्यात सचिन तेंडुलकरचा समावेश केला.

२०१५ - जर्मनीची जुनी राजधानी असलेल्या बॉन शहराच्या महापौरपदासाठी भारतीय वंशाचे अशोक श्रीधरन यांचा शपथविधी.

२०१९ - जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT