Devendra Fadnavis-Ajit Pawar-Eknath shinde Sarkarnama
विशेष

Mahayuti Melave : महायुतीचे महामेळावे होणार दणकेबाज; 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर जबाबदारी

Maharashtra Politics : राज्यातील 25 मंत्र्यांसह एकूण 52 नेते विविध जिल्ह्यांत जाऊन महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारची धोरणे आणि विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत.

Vijaykumar Dudhale

Maharashtra Political News : राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महायुतीचे मेळावे उद्या (ता. 14 जानेवारी) राज्यभर आयोजिण्यात आले आहेत. हे मेळावे यशस्वी करण्याची जबाबदारी राज्यातील 25 मंत्र्यांसह प्रमुख 52 नेत्यांवर सोपवली आहे, त्यामुळे महायुतीचे हे मेळावे दणकेबाज होणार हे आता निश्चित आहे. (52 leaders including 25 ministers will be responsible for the Melava of Mahayuti)

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपसह मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचे मनोमिलन व्हावे. मागील मतभेद बाजूला ठेवून एकत्र काम करावे. निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी या नेत्यांमध्ये एकोपा निर्माण व्हावा, यासाठी महायुतीचे उद्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांत महामेळावे आयोजिण्यात आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या महामेळाव्यातून तीनही पक्षांची एकत्रित ताकद विरोधकांना दाखवून देण्याचा प्रयत्न होणार आहे. महायुतीचे उद्या राज्यभर शक्तिप्रदर्शन होणार आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सभा गाजविणाऱ्या नेत्यांवर महायुतीने हे मेळावे यशस्वी करण्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे उद्या राज्यात एकापेक्षा एक सरस भाषणे होण्याची शक्यता आहे.

राज्यातील 25 मंत्र्यांसह एकूण 52 नेते विविध जिल्ह्यांत जाऊन महायुती आणि केंद्रातील मोदी सरकारची धोरणे आणि विकासकामे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहेत. दुसरीकडे, हे 52 प्रमुख नेते महाविकास आघाडीवर शेलक्या शब्दांत तोफ डागणार, हे निश्चित आहे. त्यामुळे राज्यात उद्या आरोपांची राळही उठललेली दिसेल.

महायुतीच्या मेळाव्याची जबाबदारी असलेले नेते आणि जिल्हा पुढीलप्रमाणे

१) नागपूर : श्रीमती चित्रा वाघ (भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा), जयदीप कवाडे (रिपब्लिकन पक्ष कवाडे गट)

२) गडचिरोली : सुबोध मोहिते (माजी केंद्रीयमंत्री)

३) नगर : राधाकृष्ण विखे-पाटील (कॅबिनेटमंत्री)

४) अकोला : प्रवीण दरेकर (गटनेते भाजप, विधान परिषद)

५) सोलापूर : चंद्रकांत पाटील (कॅबिनेटमंत्री)

६) अमरावती : बच्चू कडू (माजी मंत्री), अनिल बोंडे (खासदार), रवी राणा (आमदार)

७) पुणे : रामराजे नाईक-निंबाळकर (माजी सभापती, विधान परिषद), आमदार प्रसाद लाड (समन्वयक महायुती)

८) भंडारा : विजयकुमार गावित (कॅबिनेटमंत्री)

९) धुळे : गिरीश महाजन (कॅबिनेटमंत्री)

१०) लातूर : संभाजी निलंगेकर-पाटील (माजी मंत्री)

११) नांदेड : उमेश पाटील (नेते, राष्ट्रवादी)

१२) जळगाव : गुलाबराव पाटील (कॅबिनेटमंत्री)

१३) बुलढाणा : दिलीप वळसे-पाटील (कॅबिनेटमंत्री)

१४) नाशिक : दादा भुसे (कॅबिनेटमंत्री)

१५) यवतमाळ : संजय राठोड (कॅबिनेटमंत्री)

१६) वाशिम : आनंदराव अडसूळ (माजी मंत्री)

१७) सांगली : विनय कोरे (माजी मंत्री), सदाभाऊ खोत (माजी मंत्री)

१८) छत्रपती संभाजीनगर : रामदास आठवले (केंद्रीयमंत्री), जोगेंद्र कवाडे (अध्यक्ष-जोगेंद्र कवाडे गट, रिपब्लिकन पक्ष), संदीपान भुमरे (कॅबिनेटमंत्री)

१९) रत्नागिरी : उदय सामंत (कॅबिनेटमंत्री)

२०) रायगड : खासदार सुनील तटकरे (प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी)

२१) धाराशिव : तानाजी सावंत (कॅबिनेटमंत्री)

२२) परभणी : संजय बनसोडे (कॅबिनेटमंत्री)

२३) पालघर : रवींद्र चव्हाण (कॅबिनेटमंत्री), हितेंद्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघाडी)

२४) सिंधुदुर्ग : आदिती तटकरे (कॅबिनेटमंत्री)

२५) हिंगोली : अब्दुल सत्तार (कॅबिनेटमंत्री)

२६) मुंबई : दीपक केसरकर (कॅबिनेटमंत्री), आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), राहुल शेवाळे (खासदार, शिंदे गट), अविनाश महातेकर (माजी मंत्री, रिपाइं आठवले गट), सचिन खरात (रिपाइं खरात गट), सिद्धार्थ कासारे (रिपाइं आठवले गट)

२७) कोल्हापूर : हसन मुश्रीफ (कॅबिनेटमंत्री)

२८) बीड : धनंजय मुंडे (कॅबिनेटमंत्री), तानाजीराव शिंदे (शिवसंग्राम)

२९) सातारा : शंभूराज देसाई (कॅबिनेटमंत्री)

३०) ठाणे : श्रीकांत शिंदे (खासदार)

३१) मुंबई उपनगर : आशिष शेलार (अध्यक्ष, मुंबई भाजप), छगन भुजबळ (कॅबिनेटमंत्री), गजानन कीर्तीकर (खासदार), रामदास कदम (माजी मंत्री)

३२) गोंदिया : धर्मरावबाबा अत्राम (कॅबिनेटमंत्री)

३३) नंदुरबार : अनिल भाईदास पाटील (कॅबिनेटमंत्री)

३४) वर्धा : दीपक सावंत (माजी मंत्री)

३५) चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार (कॅबिनेटमंत्री)

३६) जालना : अतुल सावे (कॅबिनेटमंत्री)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT