Shambhuraj Desai-Ajit Pawar-Devendra Fadnavis-Nana Patole Sarkarnama
विशेष

Budget Session : अजितदादा हे शिंदेंच्या, तर अजय चौधरी विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसले अन्‌ विधानसभेत जुगलबंदी रंगली!

Maharashtra Political News : नाना पटोले हे सरकारी पक्षाला कोंडीत पकडत आहेत, हे लक्षात येताच पटोले यांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी बाकावरून मान्य मान्य आहे, असे सांगण्यात आले.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 11 March : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सोमवारपासून (ता. 10 मार्च) सुरू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. सभागृहात शिवसेनेचे अजय चौधरी हे विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसले होते, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसले होते, त्यावरून विधानसभेत वार पलटवार करण्यात आले.

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी औचित्याचा मुद्याच्या आधारे प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले ‘ अध्यक्ष महोदय, विधानसभेत आपण विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती केली आहे का,’ याची माहिती आम्हाला हवी आहे. कारण, विरोधी पक्षनेतेपदाच्या आसनावर शिवसेनेचे अजय चौधरी बसले आहेत, आपण त्यांची त्या पदावर नेमणूक केली असेल तर आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं लागेल, असे सांगून ठाकरे गटाला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या औचित्याच्या मुद्यावरून विरोधी पक्षाकडून काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर पलटवार केला. ‘अध्यक्ष महोदय, अजय चौधरी हे जसे विरोधी पक्षनेतेपदाच्या खुर्चीवर बसले आहेत, तसे उपमुख्यमंत्री अजित पवार हेही माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर बसले आहेत. त्यामुळे हा काय फरक झाला आहे का? त्याची माहिती सभागृहाला द्यावी, असा टोला नाना पटोले यांनी शंभूराज देसाई यांना लगावला.

नाना पटोले हे सरकारी पक्षाला कोंडीत पकडत आहेत, हे लक्षात येताच पटोले यांना उत्तर देण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. ‘आम्ही आदलाबदल करत असतो; म्हणून कालच (सोमवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, असा पलटवार केला. त्याला शिवसेनेचे शंभूराज देसाई यांनीही ‘हा’ म्हणत हुंकार भरला.

मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर विरोधी बाकावरून मान्य मान्य आहे, असे सांगण्यात आले. पण, सत्ताधारी बाकारून पुन्हा विरोधी पक्षनेतेपदावरून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षनेतेपदाबाबत काय असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर खुद्द विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्याबाबतचा निर्णय मी घेईन, मला विचारा, असे स्पष्ट करत कामकाज पुढे रेटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT