Padalkar On Budget : गोपीचंद पडळकरांची अर्थसंकल्पावर मजेशीर प्रतिक्रिया, ‘नीट बघायला पाहिजे...त्यांनी काय घोषणा केल्या, हे मी नीट ऐकलंच नाही’

Maharashtra Budget 2025 : अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत आज मांडला. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर सडकून टीका होत असतानाच सत्ताधारी भाजपतील काही आमदाराची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.
Ajit Pawar-Gopichand Padalkar
Ajit Pawar-Gopichand PadalkarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 10 March : अर्थमंत्री अजित पवार यांनी महायुती सरकारचा २०२५-२६ या वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत आज मांडला. या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकांची घोषणा सोडता नवीन कुठलीही घोषणा नाही. विरोधकांकडून या अर्थसंकल्पावर सडकून टीका होत असतानाच सत्ताधारी भाजपतील काही आमदाराची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे.

पवारांच्या विरोधात नेहमीच टीकेची झोड उठविणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या. ते म्हणाले, ते बघायला पाहिजे, नीट. त्यात काय काय आहे. सभागृहात मी आता त्यांचं भाषण ऐकलं. जरा सविस्तर बघून तुम्हाला सांगतो की... म्हणत काढता पाय घेण्याचा प्रयत्न केला.

अर्थसंकल्पावर तुम्ही समाधानी आहात का? की चुनावी जुमला वाटला तुम्हा मोठमोठ्या घोषणा पाहून, यावर आमदार पडळकर म्हणाले, ते जरा व्यवस्थित बघून सांगतो तुम्हाला डिटेलमध्ये. त्यांनी काय घोषणा केल्या, हे मी जरा नीट ऐकलेलं नाही, असे म्हणत निघून जाणे पसंत केले.

Ajit Pawar-Gopichand Padalkar
Budget Session 2025 : ‘संगमेश्वरात संभाजीराजेंचे, आग्र्यात शिवरायांचे भव्य स्मारक...’ अजितदादांच्या एकामागून एक घोषणा अन्‌ विधानसभा जयजयकाराने दुमदुमली!

शेतकरी कर्जमाफीची अपेक्षा होती : उत्तम जानकर

या अर्थसंकल्पावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar)यांनी प्रतिक्रिया देताना सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करायला पाहिजे होती. कारण सर्व महाराष्ट्र त्या घोषणेकडे आस लावून बसला होता. पण या महायुती सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यावर उद्या (ता. ११ मार्च) सभागृहात आवाज उठविला जाईल, असे सांगितले.

लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्याची घोषणा महायुतीने आपल्या घोषणा पत्रात केली होती. मात्र तीही सरकारने केलेली नाही. पण सर्वांत महत्वाचं म्हणजे हार्ट ऑफ महाराष्ट्र कर्जमाफीची शेतकऱ्यांना अत्यंत गरज आणि आवश्यकता होती, असेही जानकर यांनी स्पष्ट केले.

ते म्हणाले, ग्रामीण महाराष्ट्रात वीज, पाणी आणि सगळ्या गोष्टींचा बोजवारा उडालेली आहे. कर्जमाफी दिली असती तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. पण या अर्थसंकल्पात कुठेही दिसत नाही.

Ajit Pawar-Gopichand Padalkar
Anjali Damania : ‘तू जास्त बोलल्यामुळे मला त्रास होतोय, धनंजय मुंडे बालाजी तांदळेवर भडकलेत’; तीन मोबाईलवरून मुंडे आरोपींना मेसेज पाठवायचे’

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे अर्थ नसलेला संकल्प आहे. तो दोन्ही अर्थाने, एक तर तिजोरीत पैसा नाही आणि त्यांच्या संकल्पानांना काही अर्थ नाही. आचार्य अत्रे आज असते तर त्यांनी असं म्हटलं असतं की, गेल्या दहा हजार वर्षांत एवढा बोगस अर्थसंकल्प मी पाहिलेला नाही, असे सांगून महायुती सरकारच्या अर्थसंकल्पाची खिल्ली उडवली.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com