Ajit Pawar-Sharad Pawar-Yugendra Pawar Sarkarnama
विशेष

Yugendra Pawar ‘अजितदादा अन्‌ पवारसाहेब दोघेही माझेच; मी कशाला एक भूमिका घेऊ’

Pawar Family News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निमंत्रण स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. पण...

Vijaykumar Dudhale

Baramati News : मी सध्या राजकारणात नाही, त्यामुळे भूमिका (अजित पवार की शरद पवार गट) घेण्याचे माझे कोणतेही कारण नाही. माझा संबंधच येत नाही. दोघेही माझे आहेत, त्यामुळे मी कशाला एक भूमिका घेऊ. आजच्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही शरद पवार आणि अजित पवार यांचेही कटआट्‌स लावले आहेत, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी पवार कुटुंबीयांतील दोन नेत्यांच्या भूमिकेवर भाष्य केले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बारामती कुस्तीगिर संघाच्या वतीने भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती येथे आज सायंकाळी ही कुस्ती स्पर्धा होणार आहे. त्यानिमित्ताने बोलताना युगेंद्र पवार यांनी काका अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्यातील राजकीय भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते म्हणाले की, बारामती कुस्तीगिर संघाच्या वतीने 1997 पासून येथे कुस्त्यांचे आयोजन करण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून मी बारामती कुस्तीगिर संघाची जबाबदारी सांभाळत आहे. हा कौटुंबिक कार्यक्रम आहे, त्यामुळे बारामतीतील ज्येष्ठ पहिलवान येणार आहेत. या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवार, रणजित पवार, प्रतापराव पवार आणि श्रीनिवास पवार हे येणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कुस्ती स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आलेले आहे. पण, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. त्यांना वेळ मिळाला आणि बारामतीत असतील तर ते कुस्ती स्पर्धेला नक्की येतील, असा दावाही युगेंद्र पवार यांनी केला.

ते म्हणाले की, महाराष्ट्र केसरी सिंकदर शेख आणि शिवराज राक्षे हे दोघेही आज बारामतीत कुस्ती खेळण्यासाठी येणार आहेत. याशिवाय मनोज खत्री, सोनू कुमार, हर्षद सदगीर, प्रकाश बनकर, भारत मदने आणि माऊली जमदाडे यांचा खेळ आज बारामतीकरांना पाहता येणार आहे. या पहिलवानांच्या टॉपच्या कुस्त्या असणार आहेत. तसेच, कुस्तीगिर संघाच्या पहिलवानांच्याही कुस्त्या असणार आहेत.

राजकारणात प्रवेश करण्याबाबत अजून मी कोणताही विचार केलेला नाही. पण, बघू... भविष्यातलं कोणी काय बघितलं आहे. आज माझ्यावर जबाबदाऱ्या खूप आहेत. त्यात विद्या प्रतिष्ठानाचा खजिनदार, शरयू ॲग्रो साखर कारखान्याचा संचालक, बारामती कुस्तीगिर संघाची जबाबदारीही माझ्यावरच आहे. शरयू उद्योग समूहही माझ्याकडेच आहे. त्यामुळे माझ्याकडे जबाबदाऱ्या खूप आहेत. राजकारणात येण्याबाबत जनता ठरवत असते. ते मी कसं ठरवणार, असा सवालही युगेंद्र पवार यांनी केला.

Edited By- Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT