Nagpur Winter Session : शरद पवार गटाच्या आमदाराचा सरकारला थेट इशारा..!

MLA Shashikant Shinde on Maratha reservation : मराठा आरक्षणावरुन आमदार शशिकांत शिंदे आक्रमक ; 24 तारखेनंतर होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार..
Shashikant Shinde
Shashikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सरकारने मोठ्या आत्मविश्वासाने 24 डिसेंबरची तारीख दिली आहे. त्यादिवशी निर्णय न झाल्यास तेथून पुढच्या परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचा थेट इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.

तर सरकारमधील पक्षांचे लोकच वातावरण बिघडवत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात (Nagpur Winter Session) सुरु असलेल्या मराठा आरक्षणावरुन चांगलेच वातावरण तापले आहे. सभागृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले.

Shashikant Shinde
Ayodhya Ram Temple : राम मंदिर लढ्यासाठी रक्ताचं पाणी करणारी माणसे गेली कुठे?

ते म्हणाले, मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी सरकारच्या शिष्टमंडळातील गिरीश महाजन यांनी स्वत: 24 डिसेंबर हि तारिख मनोज जरांगे पाटील यांना दिली होती. तर मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेत हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्नी सभागृहात तोडगा निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

राज्यात अनेक आंदोलने झाली. मराठा, धनगर समाजाचे मोर्चे निघाले पण कधी समाजात तेढ निर्माण झाला नाही. परंतु आताच का राज्यातील वातावरण चिघळले आहे. याच उत्तर आम्हाला सभागृहात अपेक्षित होत, मात्र सरकारने ते दिले नाही. वेळ मारुन नेण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते पुढे म्हणाले, राज्यातील समाजबांधवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी साथ देण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीला मान देते समाजांनी शांतता दाखविली होती. मात्र, सरकारमधील मित्रपक्ष व त्यांचे प्रतिनिधीच वातावरण बिघडवून जातीय तेढ निर्माण करु पाहत आहेत. आम्हाला सरकारने कोणत्याही प्रश्नांची उत्तरे सभागृहात दिली नाहीत.

आजच्या दिवशी आरक्षणाचा प्रश्न निवळेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकारने वेळ मारुन नेत विरोधकांना त्यांचे मुद्दे मांडू दिले नाहीत. तसेच सभागृहाचे कामकाज रेटून नेण्याचे काम सरकाने केले आहे हे दुर्दैव आहे. राईट टू रिप्लाय ने आम्हाला उत्तरे मिळाली नाहीत याचा आम्ही निषेध करत आहोत. तर येत्या 24 तारखेनंतर महाराष्ट्रात काही घडल्यास त्यास सरकार जबाबदार राहिल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

(Edited by Amol Sutar)

Shashikant Shinde
Winter Session : फडणवीसांनीच दुष्काळी भागाला न्याय दिला; आता औंधच्या योजनेस निधी द्या : जयकुमार गोरे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com