Ajit Pawar &NCP Leader Sarkarnama
विशेष

Maharashtra Politic's : शिंदे-फडणवीसांआधीच अजितदादांनी शरद पवारांकडे चहा घेतला का?

चहापानाचे नाट्य रंगत असतानाच अजितदादांनी मुख्यमंत्री सत्ताधारी मित्रपक्षांआधीच पक्षांतर्गत विरोधकांकडे चहा घेतला का, याची चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : शिंदे-फडणवीस सरकारची साथ दिल्यानंतर नवे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या गटासाठी अधिवेशनाआधीचा मानाचा चहापान महत्वाचा आहे. त्या कार्यक्रमात तीनही पक्षांचे मंत्री-आमदार एकत्र येऊन चहा घेतील; पण त्याआधीच अजितदादा आणि त्यांचे मंत्री, नेत्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. परिणामी, पवारांसोबतच्या ४० मिनिटांच्या भेटीत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या सर्वांचा पाहुणचारही झाल्याचे समजते. चहापानाचे नाट्य रंगत असतानाच अजितदादांनी मुख्यमंत्री सत्ताधारी मित्रपक्षांआधीच पक्षांतर्गत विरोधकांकडे चहा घेतला का, याची चर्चा आहे. (Ajitdada did take tea with Sharad Pawar before Shinde-Fadnavis?)

विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून (ता. १६ जुलै) सुरू होत आहे. अधिवशेनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांसाठी परंपरेप्रमाणे एकत्र चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार आज सायंकाळी चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अगोदरच पुन्हा एकदा राजकीय घडामोड घडली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे ३५ ते ४० आमदार शिवसेना-भाजप युतीसोबत गेले आहेत. त्यातील अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर आठ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री आणि नेते आज सकाळी अचानक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ ठेवण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, मार्ग काढावा, अशी विनंती अजित पवार गटाच्या नेत्यांनी केली. शरद पवार यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. पण, त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ही भेट तब्बल ४० मिनिटे चालली. मात्र, वायबी सेंटरमध्ये गेलेले अजित पवार आणि त्यांच्या नेत्यांसाठी वायबी सेंटरमध्ये पाहुणचारही झाल्याची चर्चा रंगली आहे.

सत्ताधारी आणि विरोधकांसाठी आज चहापानाचा कार्यक्रम आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चहापान घेण्याअगोदर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे वायबी सेंटरमध्ये चहा घेतला का, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT