Ajit Pawar Meet Sharad Pawar : अजित पवारांचे मंत्री शरद पवारांच्या भेटीला; जयंत पाटील, आव्हाडांनाही बोलावले

सुप्रिया सुळे यांनी फोन करून वायबी सेंटरला भेटीसाठी येण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भेटीची पूर्वकल्पना जयंत पाटील यांना नव्हती, हे स्पष्ट होते.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे सर्व मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सेंटरला गेले आहेत. मात्र, या सर्व घडामोडींची कुठलीही माहिती आपल्याला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे या भेटीचीही माहिती जयंत पाटील यांना नसल्याचे दिसून येते. (Ajit Pawar's meeting with Minister Sharad Pawar; Jayant Patil, Awhad also Attend)

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि जितेंद्र आव्हाड ((jitendra Awhad)) हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या बंगल्यावर विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांना सुप्रिया सुळे यांनी फोन करून वायबी सेंटरला भेटीसाठी येण्याचे सांगितले आहे. त्यामुळे या भेटीची पूर्वकल्पना जयंत पाटील यांना नव्हती, हे स्पष्ट होते.

Ajit Pawar
Vikhe Patil Warning : थोरातांच्या गावातून विखेंचा वाळूतस्करांना दणका; प्रवरेतील वाळूउपशाच्या चौकशीचा रोख कोणाकडे?

जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेटीसाठी वेग मागितली हेाती की नाही, याची मला काही कल्पना नाही. मला तिकडेच बोलावले आहे, त्यामुळे मी तिकडे निघालो आहे. या भेटीसंदर्भात मला काहीच माहिती नाही. मला आता फोन आलायं की तुम्हाला बोलावलं आहे म्हणून. अहो मला काहीच माहिती नाही.

Ajit Pawar
Solapur Politic's : उद्धव ठाकरे अन्‌ काँग्रेससोबत अजितदादांना जायचंच नव्हतं; शिंदे गटाच्या आमदाराचा गौप्यस्फोट

मला काहीच माहिती नाही, त्यामुळे तुमच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे नाही. आम्ही पवारसाहेबांनी भूमिका घेतलेली आहे. मला माहिती नाही त्या ठिकाणी कोण आलं आहे. मला फक्त लवकर येण्याचा निरोप आला आहे. कोण आलं आहे, कशासाठी आलं आहे, याबाबत मला काहीच माहिती नाही, त्यामुळे मी आपल्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकत नाही, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com