Devendra Fadnavis  Sarkarnama
विशेष

News Arena India Survey : भाजपला सर्वाधिक जागा; मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना ३५ टक्के जनतेची पसंती

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर भारतीय जनता पक्षाला सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज ‘न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती देवेंद्र फडणवीस यांना मिळाली असून राज्यातील तब्बल ३५ टक्के लोकांनी फडणवीस यांना कौल दिला आहे. (BJP has the most seats; Devendra Fadnavis is favored by 35 percent of the people as Chief Minister)

'न्यूज एरेना डंडिया या संस्थेने कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये केलेल्या पाहणीचे अंदाज बिनचूक ठरले होते. या संस्थेच्या सर्व्हेनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसने (Congress) बहुमत मिळविले होते. महाराष्ट्राबद्दल केलेल्या पाहणीमध्ये भाजपला (BJP) आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सर्वेक्षणातील वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सर्वाधिक २१ टक्के लोकांनी अशोक चव्हाण यांना पसंती दिली आहे. अजित पवार यांना (१४ % तर एकनाथ शिंदे यांना १२ % लोकांनी कौल दिला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तर ९ टक्के लोकांनी मुख्यमंत्री म्हणून पसंत केले आहे.

महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी चांगली होणार असली तरी ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळण्याचा अंदाज न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे.

महाविकास आघाडी एकत्र लढली नाही तर काँग्रेसला २८ ते ३० जागाच मिळू शकतील, असा अंदाज आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ठाकरे गटापेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. त्यांना २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. मुस्लिम समाज एकसंघपणे एआयएमएमआयच्या पाठीशी उभा राहील, असा अंदाज सांगण्यात आलेला आहे, त्यामुळे एआयएमएमआयच्या जागा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या सर्वेक्षणातील धक्कादायक बाब म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या जागा वाढणार असल्या तरी ठाकरे गटाची साथ त्यांना मिळण्याची शक्यता कमी वाटते. कारण, कोकणाबाहेर ठाकरे गटाचा प्रभाव दिसत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT