Devendra Fadnavis Sarkarnama
विशेष

Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात फडणवीसांचा मोठा निर्णय; थेट सुप्रीम कोर्टाच्या वकिलांना...

Devendra Fadnavis Big Statement : मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवशी फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील राज्य सरकारच्या वकिलांशी चर्चा केली आहे.

Vijaykumar Dudhale

Mumbai, 06 December : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताचा देवेंद्र फडणवीस ‘ॲक्शन मोड’वर आले आहेत. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेताच पहिल्या दिवशी फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील राज्य सरकारच्या वकिलांशी चर्चा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला देण्यात आलेला स्टे लवकरात लवकर उठवण्यात यावा, अशी विनंती करण्याची सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी वकिलांना केली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी (ता. 05 डिसेंबर) शपथ घेतली, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे तातडीने कामाला लागले आहेत. त्यांनी पहिलाच निर्णय हा पुण्यातील एका गरजूला रुग्णाला पाच लाख रुपयांची मदत देण्यासंदर्भातील घेतला आहे. तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भातही फडणवीस यांनी मोठे पाऊल उचललेले आहे.

राज्यातील महानगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदींच्या निवडणुकी गेल्या साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये काहींसे निरुत्साहाचे वातावरण आहे. कार्यकर्त्याना संधी मिळावी, यासाठी महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवसापासून प्रयत्न सुरू केले आहेत.

फडणवीस म्हणाले, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी आम्हालाही अपेक्षा आहे. सदृढ लोकशाहीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भातील निर्णय अडकलेला आहे. या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, यासाठी आमचा संपूर्ण प्रयत्न राहणार आहे.

मी कालच (गुरुवारी, ता. 05 डिसेंबर) राज्य सरकारच्या वकिलांशी बोललो आहे. तुम्ही ‘अर्ली हेअरिंग’चा अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर असलेला ‘स्टे’ लवकरात लवकर हटवा, अशी विनंती तुम्ही न्यायालयाला करावी, असे मी राज्य सरकारच्या वकिलांना बोललो आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात, अशा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्या दृष्टीने आम्ही पाऊले उचलली आहेत, असे फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातल महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका लवकरच होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT