Maharashtra Politic's : शिवसेनेला गृहमंत्रिपद देण्यास भाजपचा ठाम विरोध; शिंदेंपुढे ‘या’ तीन मंत्रिपदाचा पर्याय!

Mahayuti Government : मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. पण, भाजपने ते देण्यासाठीही शिंदे यांना नकार दिला आहे, त्यामुळे यांना कोणते मंत्रिपद मिळणार, याची चर्चा रंगली आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 06 December : निकालानंतर तब्बल 12 दिवसानंतर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडला. मुख्यमंत्रिपदासाठी रंगलेले नाट्य संपल्यानंतर आता मोठ्या खात्यांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. गृहमंत्रिपद नाकारल्यानंतर शिवसेनेकडून महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांसंदर्भात विचार सुरू आहे. यातील एक खाते शिवसेनेला निवडावे लागणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ‘एनडीए’तील नेत्यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार यांचा शपथविधी सोहळा पार पडला. तत्पूर्वी मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तासंघर्ष रंगला होता. मात्र, भाजपकडून ठाम नकार आल्यानंतर शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी नकार दिला होता. मात्र, शेवटच्या क्षणी शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले.

मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर एकनाथ शिंदे हे गृहमंत्रिपदासाठी (Home Minister) आग्रही होते. पण, भाजपने ते देण्यासाठीही शिंदे यांना नकार दिला आहे, त्यामुळे यांना कोणते मंत्रिपद मिळणार, याची चर्चा रंगली आहे. गृहखात्याइतकेच महत्वाचे, तोडीस तोड खाते मिळविण्याकरता शिवसेना आग्रही आहे. मात्र, भाजपकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेना अस्वस्थ आहे.

Eknath Shinde
Nana Patole : निमंत्रण दिले असते, तर शपथविधीला गेलो असतो; नाना पटोलेंची गुगली

गृहमंत्रिपदीपदाबरोबच ऊर्जा आणि गृहनिर्माण खातेही शिवसेनेला मिळण्याची शक्यता कमी आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेपुढे आता गृहमंत्रिपदाच्या बदल्यात तीन मोठ्या मंत्रिपदापैकी एका मंत्रालयाचा पर्याय असणार आहे. त्यातील कोणता पर्याय शिंदे निवडणार, याकडे शिवसैनिकांंचे लक्ष असणार आहे.

गृहमंत्रालयाच्या बदल्यात शिंदेंपुढे तीन मंत्रिपदाचा पर्याय असल्याची माहिती आहे. त्यात महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग या खात्यांच्या मंत्रिपदाचा शिवसेनेकडून विचार सुरू आहे. शिवसेनेला या तीन खात्यांच्या पर्यांयांपैकी एका खात्याचा पर्याय निवडावा लागणार आहे.

Eknath Shinde
Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारात सोलापुरातून देशमुखांना संधी की नव्या चेहऱ्याला पसंती?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गृहमंत्रिपदाबाबत मौन बाळगले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला कोणती आणि किती खाती मिळतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. भाजप 2014 पासून ज्या ज्या वेळी सत्तेवर आला, त्या त्या वेळी फडणवीस यांनी गृहमंत्रिपद स्वतःकडे ठेवले आहे, त्यामुळे याही खेपेला फडणवीस हे गृहमंत्रिपद हे स्वतःकडे ठेवतील, असा कयास वर्तविण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com