Assembly Election Exit Poll Sarkarnama
विशेष

Maharashtra Election 2024 Exit Poll: मतमोजणीस काही तास शिल्लक नव्या 'एक्झिट पोल'ने उडवली झोप; महायुती 112, मविआ 104 अन् तब्बल 61 जागा...

Political News : विधानसभा निवडणुकीचा निकाल काही तासातच लागणार असताना आणखी एका पोलने चक्रावून टाकले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मतांचं अंतर केवळ एक टक्का इतके असणार आहे. त्यांच्यामधील जागांची तफावत केवळ 8 जागांची असेल. तर 61 जागांवर अटीतटीच्या लढती होत आहेत.

Sachin Waghmare

Mumbai News : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. शनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून या निवडणुकीत कोण विजयी गुलाल उधळणार ? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीत आणखी एका पोलने चक्रावून टाकले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मतांचे अंतर केवळ एक टक्का इतके असणार आहे. त्यामुळे नेतेमंडळींची झोप उडाली आहे. (Maharashtra Election 2024 Exit Poll )

विधानसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. गेल्या पाच वर्षांत राज्यात अभूतपूर्व घडामोडी पाहायला मिळाल्या. शिवसेना (Shivsena) व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या उभ्या फुटीनंतर मतदार कोणाच्या पाठीशी उभेच राहणार याची उत्सुकता लागली आहे. निकालाला काही तास राहिलेले असताना सी व्होटरचा चक्रावून टाकणारा आकडे समोर आणले आहेत.

या पोलच्या आकडेवारीनुसार महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मतांचं अंतर केवळ एक टक्का असणार आहे. त्यांच्यामधील जागांचे अंतर केवळ आठ जागांची असणार आहे. तर ६१ जागांवर अगदी अटीतटीच्या लढती होतील. याच ६१ जागा राज्यात कोणाचं सरकार येणार याचा निकाल लावतील, अशी आकडेवारी पुढे आली आहे.

महायुतीला 41 टक्के मतांसह 112 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला 40 टक्के मतांसह 108 जागांवर यश मिळण्याचा अंदाज आहे. तब्बल 61 जागांवर अगदी घासून लढत होईल. त्यामुळे कवणाची सत्ता येणार हे पाहण्यासाठी मतमोजणी पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे.

राज्यातील दोन विभागांत महायुती, तर दोन विभागांत महाविकास आघाडी पुढे आहे. एका विभागात अटीतटीचा मुकाबला आहे. त्यामुळे राज्यस्तरावर व्होट शेअरमध्ये फारसं अंतर नसणार आहे. मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात महायुतीला व्होट शेअरच्या बाबतीत मोठी आघाडी आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात महाविकास आघाडीकडे मोठ्या अंतरानं पुढे आहे. पण विदर्भात परिस्थिती वेगळी आहे. व्होट शेअरच्या बाबतीत इथे काँटे की टक्कर आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष कोण असेल, कोणाला बहुमत मिळेल, यामध्ये विदर्भाची भूमिका निर्णायक असणार आहे.

'अटीतटीच्या लढती असलेल्या 61जागांपैकी बहुतांश जागा एका पारड्यात गेल्यास सुस्पष्ट निकाल लागेल. पण या जागा 30-30 अशा दोन्ही बाजूला गेल्यास तर बहुमताचा आकडा गाठणं महायुती, महाविकास आघाडीला अवघड असेल. 61 पैकी अधिकाधिक जागा एका बाजूला गेल्यास आघाडी किंवा महायुतीला बहुमत मिळेल. पण या जागा एका बाजूला जाणार नाहीत, असा सर्व्हे सांगतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT