Rajan patil
Rajan patil sarkarnama
विशेष

निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही : राजन पाटलांचा राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींना इशारा

सरकारनामा ब्यूरो

अनगर (जि. सोलापूर) : ‘‘आम्ही राजकीय क्षेत्रात पदार्पण केल्यापासून आजपर्यंत ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या विचारधारेनुसारच राजकारण करत आलो आहोत. आम्ही निष्ठावंत असलो, तरी स्वाभिमान गहाण ठेवणारी माणसं नाहीत,’’ अशा शब्दांत मोहोळ माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना अप्रत्यक्ष इशारा दिला. (Former MLA Rajan Patil's warning to party leaders of NCP)

गेल्या काही दिवसांपासून राजन पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यात रंगली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी त्यांनी दिल्लीत आमदार बबनराव शिंदे यांच्यासोबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर तर पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग आला होता. त्या पार्श्वभूमीवर अनगरमध्ये झालेल्या मेळाव्यात राजन पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

लोकनेते (स्व.) बाबूरावअण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अनगर येथे आयोजित मोहोळ तालुक्यातील १०५ विविध कार्यकारी संस्थांचे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांच्या सत्कार करण्यात आला. त्याकार्यक्रमात माजी आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की, आम्ही आजपर्यंत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या विचारानेच राजकारण केलेले आहे. आम्ही निष्ठावंत असलो तरी स्वाभिमान गहाण ठेवणो नाहीत, असे त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींना ठणकावून सांगितले.

माजी आमदार पाटील म्हणाले की, आमदार यशवंत माने हे अत्यंत कार्यक्षम आणि कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून मोहोळ मतदारसंघाला लाभले आहेत. आम्ही राजकारणासाठी आजवर कधीही शेती सिंचनासंदर्भातील आश्वासनांचा वापर केलेला नाही. मोहोळ तालुक्यातील १० गावांचा समावेश आष्टी उपसा सिंचन योजनेत व्हावा, यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तातडीने बैठक लावत मतदार संघातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पाऊल टाकलेले आहे.

आमदार यशवंत माने म्हणाले की, राजन पाटील यांनीही आम्हाला काहीही नको आमच्या भागातील जनतेला पाणी द्या. अशी मागणी केल्याने वेळोवेळी आम्हाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार ,जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सहकार्याची भूमिका ठेवली आहे. ता. ३० एप्रिल रोजी मोहोळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर आल्यानंतर अजित पवारांनी त्वरित याबाबत बैठक लावण्याचा दिलेला शब्द एक जून रोजी बैठक बोलावून पूर्ण केला. या बैठकीत सदरची योजना माझी योजना माझीच आहे. अशा भावनेने गतिमानतेने सर्व्हे पूर्ण करून त्वरीत अहवाल सादर करण्याचा सूचना पवारांनी दिल्या होत्या.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे म्हणाले की, राजन पाटील आणि आम्ही गेल्या चाळीस वर्षांपासून निस्वार्था भावनेने पक्षाशी एकनिष्ठ राहिलो असून नवख्या तुटक्या माणसाला जर पक्षश्रेष्ठींची मदत होत असेल तर त्यांनी वेळीच सावध व्हावे; अन्यथा तिसरेच घडण्याची शक्यता आहे. त्यातून त्यांना पश्चात्तापाची वेळ येईल, असा इशाराच त्यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT