Hasan Mushrif facing dual political challenges ahead of the Gokul Milk Federation elections in Kolhapur  Sarkarnama
विशेष

Hasan Mushrif Crisis : हसन मुश्रीफांसमोर 'दुहेरी' संकट, मात्र आतापासून...!

Hasan Mushrif’s Dual Challenges : पण शेवटी स्थानिक राजकारणाला कोल्हापुरात महत्व असल्याने कोण कोणती भूमिका घेणार याकडे महायुती मधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असणार आहे.

Rahul Gadkar

Hasan Mushrif news : वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दोन दिवसापूर्वी केलेल्या वक्तव्यानंतर गोकुळ दूध संघातील राजकारणाच्या चर्चेला उधाण आलं आहे. पुढील वर्षी होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने केलेले वक्तव्य जिल्ह्याच्या राजकारणाला आणखी कलाटणी देणारे आहे. यापूर्वी गोकुळच्या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्र येत २५ वर्ष सत्ता असलेल्या महाडिक गटाचा पराभव पाटील-मुश्रीफ गटाने केला. पण सध्या राज्यातील राजकीय चित्र बदलले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारण लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची साथ देणार? की महाडिक गटासोबत हात मिळवणी करणार? हे पाहावे लागणार आहे.

"आपलं ठरलंय गोकुळ उरलंय" असं म्हणत काँग्रेसने नेते आमदार सतेज पाटील यांनी महाडिक गटाचा वचपा काढून सत्तेत असलेला गोकुळ दूध संघ हातातून काढून घेतला. त्याला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची साथ मिळाली. त्यावेळची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी म्हणून एकत्र असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र राहिले. इतकेच नव्हे तर जनसुराज्य शक्तीचे आमदार विनय कोरे हे देखील पाटील-मुश्रीफ यांच्यासोबत राहिले.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज पाटील या दोन कट्टर राजकीय विरोधकांना एकत्र आणत महाडिक यांना विजयापर्यंत नेले होते. मात्र लगेचच विधानसभा निवडणुकीत महाडिक गटाने काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा पराभव केल्याने महाडिक आणि पाटील गटातील वाद पुन्हा वाढला होता. त्यामुळे मुश्रीफ यांचा रोष देखील महाडिक गटावर होता.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील यांची साथ देत विश्वासघाताचा वचपा काढला. गोकुळ दूध संघातील महाडिक गटाचे दोन प्रमुख शिलेदार माजी अध्यक्ष विश्वास पाटील, अध्यक्ष अरुण डोंगळे यांनाच आपल्या बाजूने घेत संघात विजय मिळवला. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत प्रत्येक निर्णयात मुश्रीफ सहभागी होते. आजची परिस्थिती पाहता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ महायुतीचे प्रमुख नेते असले तरी, काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्याशी अजूनही मैत्री घट्ट आहे.

मात्र सध्याचे राजकीय परिस्थिती पाहता राजकीय चित्र वेगळे आहेत. महाविकास आघाडी म्हणून एकत्र आलेले नेते महायुतीमध्ये एकत्र आहेत. महाडिक गट देखील भाजपमध्ये सक्रिय आहे. पुढील वर्षी गोकुळच्या निवडणुकीत निमित्ताने पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या 75 व्या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटील आणि डोंगळे या जय वीरूच्या जोडीने पुढील निवडणूक एकत्र लढावी असे आवाहन केले.

एकंदरीतच पाहता गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे सध्या महायुतीमध्ये आहेत. शिवाय हसन मुश्रीफ यांचे जवळचे आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विश्वासातील आहेत. पुढील निवडणुकीत गोकुळच्या संघाच्या राजकारणात वरिष्ठ नेत्यांचा हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी महाडिक गटाने आतापासूनच कंबर कसली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर दबाव वाढवून गोकुळच्या निवडणुकीत महाडिक गटासोबत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत.

शिवाय मागील निवडणुकीत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांना साथ दिलेले पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, माजी आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश पाटील हे देखील महायुतीत असल्याने त्यांच्या भूमिकेला महत्व आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत सतेज पाटलांनी यांच्या विरोधात प्रचार केल्याने यंदा त्यांना साथ मिळेल याची शक्यता कमी आहे. पण शेवटी स्थानिक राजकारणाला कोल्हापुरात महत्व असल्याने कोण कोणती भूमिका घेणार याकडे महायुती मधील वरिष्ठ नेत्यांचे लक्ष असणार आहे.

त्यामुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना गतवेळी पेक्षा यंदाच्या निवडणुकीत निर्णय घेणे अडचणीचे ठरणार आहे. एकीकडे महायुती म्हणून महाडिक गटाला मदत करावी लागेल, तर दुसरी मित्र सतेज पाटील यांची साथ द्यावी लागेल. असे दुहेरी संकट मुश्रीफ यांच्यापुढे असणार आहे. पण मुश्रीफ यांनी जय विरु यांच्या केलेल्या वक्तव्यानंतर गोकुळच्या निवडणुकीत प्रमुख पदाधिकाऱ्यांचे हात सैल सोडण्याचे संकेत देत प्रत्येकाला व्यक्तिगत विचाराचे स्वतंत्र दिल्याचे स्पष्ट होत आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT