Nagpur Gurudwara Election : गुरुद्वारा 'श्री गुरु ग्रंथ साहिब' निवडणुकीच्या वादात आता अल्पसंख्याक आयोगाची उडी ; नव्या वादाला तोंड फुटणार?

Gurudwara Election Dispute in Nagpur : अल्पसंख्याक आयोगाने पोलिस आयुक्तांना या संदर्भात बैठक घेण्याचे निर्देशही दिले आहेत.
Minority Commission officials meet Sikh leaders in Nagpur amid Shri Guru Granth Sahib Gurudwara election controversy.
Minority Commission officials meet Sikh leaders in Nagpur amid Shri Guru Granth Sahib Gurudwara election controversy. sarkarnama
Published on
Updated on

Minority Commission on Nagpur Gurudwara dispute : करोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठ्यासाठी मोफत टँकर उपलब्ध करून दिलेल्या प्यारे खान यांना थेट अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपदी नियुक्ती करून भाजपने मोठमोठे बक्षीस दिले आहे. प्यारे खान यांनीसुद्धा आजवर भाजपच्या विरोधात जाऊन आपली भूमिका कधी जाहीर केली नाही. वक्फ विधेयकाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय असताना खान यांनी भाजपच्या धोरणाशी सुसंगत भूमिका घेतली आहे. नवे विधेयक समाजासाठी कसे फायद्याचे आहे आणि यामुळे गैरव्यवहार व अनियमितता कशी दूर होणार हे ते पटवून देत आहेत.

तसं बघितलं तर ते कुठल्याही वादात फारसे पडत नाहीत. आपण बरे आणि आपले काम बरे असे त्यांचे धोरण असताना त्यांनी नागपूरमधील गुरुद्वार श्री गुरु ग्रंथ साहिब जी प्रबंधक कमेटीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून निर्माण झालेल्या वादात त्यांनी उडी घेऊन वादाला आमंत्रण दिले आहे.

Minority Commission officials meet Sikh leaders in Nagpur amid Shri Guru Granth Sahib Gurudwara election controversy.
Walmik Karad Latest Update : ''..त्यामुळे वाल्मिक करडाला कधीही मारलं जाऊ शकतं'' ; 'या' व्यक्तीच्या विधानाने खळबळ!

अल्पसंख्याक आयोगाने पोलिस आयुक्तांना या संदर्भात बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. सोबतच अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुरुद्वार श्री गुरुसिंद साहीब जी प्रबंधक कमेटीच्या विद्यमान अध्यक्षांची बाजू घेऊन पुढील कार्यवाहीपर्यंत तेच अध्यक्ष राहतील असेही निर्देश दिले आहे. ही बैठक मंगळवारी (ता.१५) दुपारी एक वाजता नागपूर पोलिस आयुक्तांच्या कार्यालयात होणार आहे.

Minority Commission officials meet Sikh leaders in Nagpur amid Shri Guru Granth Sahib Gurudwara election controversy.
Social Engineering Akola : अकोल्यात नेत्यांचं ‘सोशल इंजिनिअरिंग’ जोरात!

उत्तर नागपूर परिसरातील कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बाबा दीपसिंगनगर येथील गुरुद्वाराच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून दोन गटांत सशस्त्र राडा झाला होता.. यात दोन्ही गटातील सहा ते सात जण जखमी झाले. या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पप्पू रंधावा, त्यांचा मुलगा राजा रंधावा,गील व अन्य,अशी जखमींची नावे आहेत. रंधावा यांनी अध्यक्ष गुल्लू सरदार व त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याची तक्रार केली असून सरदार यांनी रंधावा व त्यांच्या साथीदारांविरुद्ध तक्रार केली आहे.

गुल्ल सरदार हे अध्यक्ष आहेत. ६ एप्रिलला अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार होती. या निवडणूक प्रक्रियेसाठी बैठक बोलावण्यात आली होती. याकरिता गुल्लू सरदार व रंधावा यांचे समर्थक बैठकीसाठी आले होते. बैठकीदरम्यान दुपारी दोन्ही गटात वाद झाला. वाद विकोपाला गेला. दोन्ही गटांत सशस्त्र राडा झाला. यात सहा जण जखमी होऊन तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी दोन्ही गटाने एकमेकांविरोधात तक्रार दिली होती. यानंतर अध्यक्ष गुरुविंदरसिंग ढिल्लो यांनी राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली होती.

Minority Commission officials meet Sikh leaders in Nagpur amid Shri Guru Granth Sahib Gurudwara election controversy.
Robert Vadra Politics : आता रॉबर्ट वाड्राही राजकारणात एन्ट्री करणार? ; जाणून घ्या, काय केलंय सूचक विधान?

आयोगाच्यावतीने नागपूर पोलिस आयुक्तांना बैठक घेण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच आयोगाने गुरुविंदरसिंग हे मागील तेरा वर्षांपासून गुरुद्वाराच्या सेवेत आहेत. ते उत्कृष्टपणे काम सांभाळत आहे. त्यांच्या कार्यात काही गुंड प्रवृत्तीचे लोक बाधा आणत आहे. हे बघता कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून या प्रकरणाचा निर्णय होईपर्यंत जुनी कमिटीच कार्यरत असेही निर्देश दिले आहे. अल्पसंख्याक आयोगाचे अवर सचिव प्र.दा. अंधारे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी झाले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com