Raj Thackeray
Raj Thackeray Sarkarnama
विशेष

मी अयोध्येला नक्की जाणार; पण तारीख आता नाही सांगणार : राज ठाकरे

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मी अयोध्येला नक्की जाणार आहे. मात्र, कधी जाणार याची तारीख मी आज सांगणार नाही, अशी घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. (I will definitely go to Ayodhya; But the date will not tell now : Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे बोलत होते. त्यांची तोफ सचिन वाझेपासून उद्धव ठाकरे, छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यावर धडाडली. ते म्हणाले की, मी पूर्वी सांगायाचे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमधून मोठ्या प्रमाणात माणसं बाहेर पडत आहेत. त्या राज्यांचा विकास करण्याची गरज आहे. उत्तरप्रदेशमध्ये आता विकास होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. कारण सर्वांचे ओझे घ्यायला महाराष्ट्र मोकळा नाही.

हिंदू-मुस्लीम दंगलींमध्ये फक्त हिंदू असतो. ता. २६ जानेवारी आणि १६ ऑंगस्टला तो भारतीय होतो. चीनने आक्रमण केल्यावर त्याला कळतच नाही, त्याला आपण कोण आहोत ते. हे जेव्हा कळतं नाही, तेव्हा तो मराठी, गुजराती, तामिळ, बंगाली, बिहारी होतो. तो मराठी जेव्हा होतो, त्यावेळी तो मराठा, ब्राम्हण, माळी, आगारी असतो. हे काही लोकांना हवे आहे, असा आरोपही राज यांनी केला.

हिंदू म्हणून आपण कधी एकत्र येणार आहोत. कारण आपण जातीपातींमध्येच खितपत पडलो आहोत. जातींमधून बाहेर पडलो, तरच हिंदुत्वाचा ध्वज हाती घेता येईल. आम्ही आपापसांनाच ओरबडतो आहोत, त्यामुळे आपण पुढे कसे जाणार, असा सवालही मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादीवर टीका

जातीयवाद हा राष्ट्रवादीला आणि शरद पवारांना हवा आहे. १९९९ पासून जातीपातीचे राजकारण सुरु झाले आहे. पूर्वी होतो तो अभिमानाचा विषय होता. पण १९९९ पासून मराठा व इतर समाजामध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने जाती जातींध्ये तेढ निर्माण केला. बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेले म्हणजे चुकीचे आहे. ते सॉफ्ट टार्गेट आहे. जातीतून आपण बाहेर कधी पडणार आहे. ज्या देशाला महाराष्ट्राने दिशा दिली, तो जातीत अडकला आहे. महाराष्ट्रात जातीपातीच्या राजकारणात खितपत पडला आहे.

राष्ट्रवादीच्या १९९९ च्या नंतर जेम्स लेन जन्माला आहे. तो कोण होता. तो कुठे होता. त्या भिकारडय्ांनी काहीतरी आमच्या जिजाऊंबद्दल लिहिले आहे, ते आम्ही उघाळत बसलो आहे. ज्यांचा शिवरायांशी काहीही संबंध नसताना तो जेम्स लेन येथे येऊन काहीही तरी लिहितो आणि आम्ही तेच उघळत बसतो, हे काय चालेले आहे. निवडणुकीत पैसा टाकायचा, आपल्यामध्ये भांडणं लावायचं हे सध्या सुरू आहे. निवडणुकीत तुम्हाला वेडेपिसे करून टाकले जाते, असे आरोपही राज ठाकरेंनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT