Vidarbha Politics बच्चू कडू- नवनीत राणा - नरेंद्र मोदी Esakal
विशेष

Vidarbha Politics : बच्चू कडूंना मोदी हवेत, पण नवनीत राणा नको...!

गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी खोके घेतले, असे जाहीरपणे सांगणाऱ्या राणा दाम्पत्याबद्दल भाजपला असलेले अतिप्रेम बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सलत आहे. त्यामुळे आता ते राणा दाम्पत्य आणि भाजपलाही धडा शिकवण्याची भाषा बोलू लागले आहेत. Vidarbha Politics

अय्यूब कादरी

Vidarbha Politicsबच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी खोके घेतले, असा जाहीर आऱोप भाजपच्या आश्रयाखाली असलेले आमदार रवी राणा यांनी मध्यंतरी केला होता. मंत्रिपद पणाला लावून एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गुवाहाटीला गेलेल्या कडू यांची झोळी नंतर रिकामीच राहिली. मात्र, राणा यांच्या आरोपामुळे बच्चू कडू यांची कोंडी झाली होती. आता आमदार राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देऊन त्यांना खिंडीत गाठण्याची बच्चू कडू यांची व्यूव्हरचना आहे.

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अचलपूरचे आमदार बच्चू कडू Bacchu Kadu हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेले, म्हणजे शिंदेंच्या बंडात ते सामील. देवेंद्र फडणवीस यांच्या एका फोन कॉलनंतर कडू यांनी गुवाहाटी गाठली होती, हे नंतर समोर आले होते. Lok Sabha Elelcions 2024 war between Bacchu Kadu and Navneet Rana in Vidarbha

या बंडानंतर महाविकास आघाडीची Maha Vikas Aghadi सत्ता गेली, महायुती सत्तेवर आली, पण गुवाहाटीला गेलेल्या आमदारांची राज्यभरात बदनामी झाली. बदनामी सहन केल्यासारखे काहीजणांचे कल्याण झाले तर काहीजण सत्तेच्या पदापांसून उपेक्षितच राहिले. बच्चू कडू हे उपेक्षित राहिलेल्यांपैकीच एक.

हातचे सोडून पळत्याच्या मागे धावणे, अशी एक म्हण आहे. ती बच्चू कडू यांना चपखल लागू होते. मंत्रिपद सोडून शिंदे Ekanath Shinde यांना साथ दिलेल्या बच्चू कडू यांच्या वाट्याला नंतर उपेक्षाच आली. त्यांनी अखेरपर्यंत प्रतीक्षा केली, इशारे देऊन पाहिले, मात्र मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात काही पडली नाही. उद्विग्न होऊन हे सहन करण्यापलीकडे कडू यांच्या हातात काहीही राहिले नाही.

मध्यंतरी शरद पवार Sharad Pawar यांच्याशी त्यांची भेट झाली, त्यानंतर ते महाविकास आघाडीत सहभागी होतील का, अशी चर्चा सुरू झाली, मात्र अजून तर ती निव्वळ चर्चाच ठरली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि बच्चू कडू आता अपमानाचा बदला घेण्यासाठी सरसावल्याचे दिसत आहे. नवणीत राणा यांच्याविरोधात उमेदवार देण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

हेदेखील वाचा -

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा Navneet Rana या दाम्पत्याने बच्चू कडू यांचा नको तितका अपमान केला आहे. त्याची सल कडू यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कायम असल्याचे दिसत आहे. त्याचा बदला घेण्यासाठी कडू आणि त्यांचे कार्यकर्ते आता सरसावले आहेत. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी खोके घेतले होते, असा आरोप आमदार राणा यांनी जाहीरपणे केला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

राणा दाम्पत्याला सध्या भाजपने आपल्या पंखांखाली घेतले आहे. वास्तविक, खासदार राणा या गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर विजयी झाल्या होत्या. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांचा कल भाजपकडे झुकला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर आणि सरकारवर प्रहार करण्यासाठी भाजपने राणा दाम्पत्याचा पुरेपूर वापर करून घेतला.

हनुमान चालिसावरून राणा दाम्पत्याने घातलेला गोंधळ अभूतपूर्व असा होता. उद्धव ठाकरे यांच्या घरासमोरच हनुमान चालिसाचे पठण करण्याचा हट्ट नवनीत राणा यांनी केली होता. त्यावरून त्यांना अटकही झाली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि राणा यांना याचा विसर पडला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसाचे पठण करावे, असे राणा यांना एकदाही वाटले नाही. याचा अर्थ तो निव्वळ राजकीय स्टंट होता. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्याचा जिल्हा एकच आहे. जे लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निशाण्यावर घेऊ शकतात, ते आपल्याला का घेणार नाहीत, असा विचार बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाताना केला नसावा. नंतर त्याची प्रचिती कडू यांना आलीच.

नवणीत राणा आता अमरावती मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवतील, अशी शक्यता आहे. याला बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. आमदार राणा यांनी केलेल्या जाहीर अपमानाचा बदला घेण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे, हे बच्चू कडू यांनी हेरले आहे.

हेदेखील वाचा -

बच्चू कडू हे स्वबळावर, कष्टाने मोठे झालेले नेते आहेत. त्यामुळे ते दबावाला घाबरतील, याची शक्यता वाटत नाही. नवणीत राणा यांच्या विरोधात अमरावतीत उमेदवार मिळाला आहे. तो निश्चितपणे निवडून येईल, असा विश्वास कडू यांना आहे.

आता राजकारणात आपण झीरो झालो तरी चालेल मात्र शरणागती पत्करायची नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. यासाठी कार्यकर्ते पक्ष सोडण्याचीही धमकी देत आहेत, त्यामुळे आम्हाला विचार करावा लागणार आहे, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी खोके घेतले, असे जाहीरपणे सांगणाऱ्या राणा दाम्पत्याबद्दल भाजपला असलेले अतिप्रेम बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सलत आहे. त्यामुळे आता ते राणा दाम्पत्य आणि भाजपलाही धडा शिकवण्याची भाषा बोलू लागले आहेत.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT