bacchu kadu ravi rana navneet rana
bacchu kadu ravi rana navneet ranasarkarnama

Bacchu Kadu On Rana : "आम्ही रवी आणि नवनीत राणांना खूप घाबरतो, त्यामुळे...", बच्चू कडूंची खोचक प्रतिक्रिया

Bacchu Kadu On Amaravati Loksabha : "अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमचाही उमेदवार असू शकतो. लोकांमध्ये नाव आहे, असा उमेदवार देऊ," असं सूचक विधान कडूंनी केलं आहे.
Published on

अमरावती लोकसभा उमेदवारीचा ( Amaravati Lok Sabha Election 2024 ) तिढा अद्याप कायम असताना महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) यांच्या वतीनं नुकत्याच घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात 'एनडीए'च्या घटक पक्षांबाबत आमदार रवी राणा ( Ravi Rana ) यांनी एक विधान केलं होतं. त्यानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ ( Abhijeet Adsul ) यांनी संताप व्यक्त केला होता, तर प्रहारचे आमदार बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांनीही खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होते.

bacchu kadu ravi rana navneet rana
Bacchu Kadu News : ...अन्यथा 'महाविकास आघाडी'सोबत चर्चेसाठी तयार; बच्चू कडूंचा सूचक इशारा!

रवी राणा काय म्हणाले होते?

"जे लोक 'एनडीए'च्या घटक पक्षांचे इमानदारीनं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करायला लावू. येणाऱ्या काळात सगळे 'एनडीए'चे घटक खासदार नवनीत राणांच्या मंचावर दिसतील. 'एनडीए'चे घटक म्हणून खासदार राणांचा प्रचार करतील. काहींनी जर पक्षाच्या विरोधात जाऊन प्रचार केला, तर त्यांच्यावर कारवाई करणार," असा दम रवी राणांनी ( Ravi Rana ) स्थानिक 'एनडीए'तील नेत्यांना भरला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"राणांच्या धमकीचे आमच्यावर परिणाम"

यावर बच्चू कडू ( Bacchu Kadu ) म्हणाले, "आम्ही देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना घाबरतो. पण, आम्ही रवी राणा आणि नवनीत राणांना खूप घाबरतो. अशा प्रकारच्या धमकीनंतर कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. या धमकीचे आमच्यावर खूप परिणाम झाले. आम्हाला आता मंचावर जावं लागेल, असं वाटतंय."

"...तर मलाही मंचावर लागेल"

"हनुमान चालिसा म्हणल्यानं राणांना खूप बळ आलं आहे. त्यामुळे अभिजित अडसूळ आणि मलाही मंचावर जावं लागेल," अशी टोलेबाजी बच्चू कडूंनी केली आहे.

bacchu kadu ravi rana navneet rana
Lok Sabha Election 2024 : विदर्भात टिकायचे तर काँग्रेसला टाळावे लागेल मतांचे विभाजन

"आम्ही हातोड्यानं दगडं फोडतो"

आनंदराव अडसूळांना उमेदवारी जाहीर झाली, तर पाठिंबा देणार का? असं विचारल्यावर बच्चू कडूंनी म्हटलं, "पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वस्त आहे का? आम्ही 'प्रहार' आहे. आम्ही हातोड्यानं दगडं फोडतो. अमरावती लोकसभा मतदारसंघातून आमचाही उमेदवार असू शकतो. लोकांमध्ये नाव आहे, असा उमेदवार देऊ."

अभिजित अडसूळ काय म्हणाले?

"आमदार रवी राणा यांच्या धमक्यांना अजिबात भीक घालत नाही. आमदार राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची भाजपबरोबर युती नव्हती. युती ही शिवसेनेची होती. आमचे संबंध वेगळे आहेत. राणा अशा विधानांमुळे भाजप आणि सेनेतील संबंध खराब करीत आहे. त्यामुळे भाजपनं याकडे लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी," अशी मागणी अभिजित अडसूळ यांनी केली आहे.

( Edited By : Akshay Sabale )

R

bacchu kadu ravi rana navneet rana
Loksabha Election 2024 : अमरावतीत आनंदराव अडसूळ ठाम! शिवसैनिकांकडून व्हायरल बॅनरची चर्चा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com