Mahavikas Aghadi | Mahayuti  Sarkarnama
विशेष

Maharashtra Assembly Election Exit Poll: निकालास काही तास शिल्लक असताना राजकीय विश्लेषकाचा बहुमताबाबत मोठा दावा

Political analyst prediction on majority before results: विधानसभा निवडणुकीची बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन दिवसापासून पोल सुरु असल्याने सर्वच राजकीय मंडळींची धाकधूक वाढली आहे. या पोल्सवरून सत्ताधारी व विरोधक दावे-प्रतिदावे करीत आहेत. त्यामुळे निकालापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जवळपास दोन महिन्यापेक्षा अधिककाळ सुरु असलेला विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपला. गेल्या तीस वर्षात प्रथमच विक्रमी मतदान झाले आहे. यावेळेस मताची टक्केवारी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जवळपास चार टक्क्यांनी वाढली आहे. त्याचा फायदा कोणाला होणार याची उत्सुकता लागली आहे.

शनिवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसापासून उत्सुकता लागलेल्या निवडणूक निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिले असतानाच राजकीय विश्लेषक हेमंत देसाईंचे मोठं विधान केलं असून थेट राज्यात कोणाला बहुमत मिळणार याचा अंदाज वर्तवला आहे.

बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन दिवसापासून पोल सुरु असल्याने सर्वच राजकीय मंडळींची धाकधूक वाढली आहे. या पोल्सवरून सत्ताधारी व विरोधक दावे-प्रतिदावे करीत आहेत. त्यामुळे निकालापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत मताचा टक्का वाढला आहे. त्यामुळे निवडणूक निकालाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीत मोठी चुरस पहावयास मिळाली. शनिवारी मतमोजणी होत असतानाच राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी मोठा दावा केला आहे. त्यांच्या मते राज्यात महायुती व महाविकास आघाडीला राज्यात बहुमत मिळण्याची समान संधी असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

महाविकास आघाडी राज्यात मुंबई, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात वरचढ ठरेल अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत केलेली कामगिरी निर्णयकी ठरली. पक्ष फोडाफोडीमुळे असलेली सहानभूती मतदारांत असून त्यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत महायुती सरकारबाबत असलेल्या नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला होईल, असे त्यांना वाटते.

दुसरीकडे महायुती राज्यातील ठाणे, कोकण व उत्तर महाराष्ट्रात चांगली कामगिरी करेल, अशी अपेक्षा आहे. विशेषतः विदर्भात काँग्रेस व भाजपची कामगिरी कशी राहणार यावर महायुती की महाविकास आघाडी बहुमताचा आकडा पार करेल, हे ठरणार आहे. त्यामुळे विदर्भाच्या हाती सत्तेची चावी असणार आहे. त्याठिकाणी आघाडी घेणाऱ्या पक्षाची सत्ता राज्यात येणार आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला 30 जागा मिळाल्या होत्या तर महायुतीला केवळ 17 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे या निवडणूक निकालालकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, काँग्रेसला (Congress) काही भागात अपेक्षीत असलेला परफॉर्म करता आला नसल्याचा फटका त्यांना बसण्याची शक्यता देसाई यांनी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी एकसंध दिसत होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत आघाडी एकत्र असल्याचे चित्र खूप कमी जागी दिसत होते. आघाडीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. त्याचा फटका त्यांना सहन करावा लागणार आहे.

महायुतीमध्ये सर्व काही आलबेल होते असे चित्र नव्हते. काही मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्याचा फटका महायुतीमधील तीन पक्षांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सर्वांचेच भवितव्य हे अपक्ष व बंडखोरांवर अवलंबून असणार आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीवर असलेली नाराजी दूर करण्यात महायुतीला काहीसे यश आले आहे. मतदानाची वाढलेली टक्केवारी कोणाच्या फायद्याची ठरणार यावर यश अपयश अवलंबुन असणार आहे.

लाडकी बहीण योजनेमुळे मताची टक्केवारी वाढली असली तर त्याचा फायदा महायुतीला होणार आहे. त्याउलट जर राज्यात महायुतीच्या विरोधात काहीसे वातावरण होते. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ते कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

मात्र राज्यातील मतदाराना फोडाफोडीचे राजकारण पसंद पडले नसल्याने व ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल असलेल्या सहानभूतीमुळे मताचा टक्का वाढला असेल तर त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे.

राज्यातील हे चित्र पाहता याठिकाणी महाविकास आघाडी व महायुतीला बहूमतापर्यंत पोहचण्याची संधी आहे. त्यासोबतच जर मताचा टक्का ग्रामीण भागात वाढला असेल तर महाविकास आघाडी वरचढ ठरेल तर शहरी भागात मताचा टक्का वाढला असेल तर त्याच्या फायदा महायुतीला होणार आहे, असा अंदाज हेमंत देसाई यांनी वर्तविला आहे.

निकालापूर्वी अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये महायुतीचे पारडे जड वाटत असेल तरीही वाढलेला मताचा टक्का कोणाच्या फायद्याचा ठरणार हे समजण्यासाठी 23 नोव्हेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT